1 जानेवारीपासून ‘मिनरल वॉटर’ची चव बदलणार, जाणून घ्या कारण
1 जानेवारी 2021 पासून बाटलीबंद पाण्यासाठी ‘एफएसएसआय’कडून (FSSAI) नवे नियम घालून देण्यात आले आहेत. | New Rules For Bottled Water

- 1 जानेवारी 2021 पासून बाटलीबंद पाण्यासाठी ‘एफएसएसआय’कडून (FSSAI) नवे नियम घालून देण्यात आले आहेत.
- त्यानुसार आता एक लीटर बाटलीबंद पाण्यात (Mineral water) 20 मिलीग्रॅम कॅल्शियम आणि 10 मिलिग्रॅम मॅग्नेशियम हे घटक मिसळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- बिसलरी, कोका-कोला, पेप्सी यासारख्या बड्या कंपन्यांनी या नियमांचे पालन करण्याची तयारी दाखविली आहे.
- मात्र, बाटलीबंद पाणी विकणाऱ्या लहान कंपन्यांकडून या नियमाचे पालन होणार का, याबाबत अद्याप साशंकता आहे.
- मिनरल्स (Minerals) हे पाण्याच्या चवीसाठी चांगले मानले जातात. त्यामुळेच राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) बाटलीबंद पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा समावेश करण्याचे आदेश दिले होते.
- राष्ट्रीय हरित लवादाने 29 मे 2019 रोजी याबाबत आदेश काढला होता. मात्र, संबंधित कंपन्यांनी मुदतवाढ मागितली होती. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत हा नियम लागू करण्याचे आदेश FSSAI ने दिले आहेत.
- भारतात बाटलीबंद पाण्याच्या उद्योगाची उलाढाल जवळपास 3000 कोटी रुपये इतकी आहे. बाजारपेठेत बहुतांश करुन 1 लीटरच्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. हे प्रमाण जवळपास 42 टक्के इतके आहे.







