सलग सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद राहणार

| Updated on: Feb 20, 2020 | 5:27 PM

तुम्हाला जर पैशांची गरज असेल तर आजच बँकेतून पैसे काढून घ्या. कारण पुढील तीन दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत.

सलग सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद राहणार
Follow us on

मुंबई : तुम्हाला जर पैशांची गरज असेल तर आजच बँकेतून पैसे काढून घ्या. कारण पुढील तीन दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. त्यामुळे याचा फटका बँकेच्या संबंधित काम करणाऱ्या ग्राहकांना बसू शकतो. उद्या (21 फेब्रुवारी) ते रविवार (23 फेब्रुवारी) पर्यंत अशा तीन दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत.

बँक उद्या महाशिवरात्री असल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. तर शनिवारी (22 फेब्रुवारी) महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. यानंतर रविवारी बँकेला सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे.

ज्या लोकांचे बँकेसोबत दररोजचे व्यवहार चालतात लोकांसाठी पुढील तीन दिवस त्रासदायक ठरणार आहेत. पुन्हा बँका तीन दिवस बंद असणार आहेत. जर पैशांची गरज असेल तर आजच पैशांचा व्यवहार करुन घ्या.

राज्यातील सर्व बँका उद्यापासून तीन दिवस बंद असणार आहेत. या तीन दिवसांच्या सुट्टीमुळे चेक क्लियरेन्स, अकाऊंट ओपनिंग इतर कामं बंद राहणार आहेत.