आवाज केला तर ठोकून काढू, बस खाली, विदर्भवाद्यांवर गडकरींचा संताप

नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी गोंधळ घालणाऱ्या विदर्भाच्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं. गडकरींनी आपल्या भाषणावेळी स्वतंत्र विदर्भाच्या नावानं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना फैलावर घेतलं. आवाज केला तर ठोकून काढू, बस खाली, असा आक्रमक इशारा नितीन गडकरींना गोंधळी आंदोलकांना दिला. ‘ते जर पुन्हा गोंधळ घालणार असतील, तर त्यांना थप्पड […]

आवाज केला तर ठोकून काढू, बस खाली, विदर्भवाद्यांवर गडकरींचा संताप
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी गोंधळ घालणाऱ्या विदर्भाच्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं. गडकरींनी आपल्या भाषणावेळी स्वतंत्र विदर्भाच्या नावानं गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना फैलावर घेतलं.

आवाज केला तर ठोकून काढू, बस खाली, असा आक्रमक इशारा नितीन गडकरींना गोंधळी आंदोलकांना दिला.

‘ते जर पुन्हा गोंधळ घालणार असतील, तर त्यांना थप्पड लगावा. लक्षात ठेवा, आरडाओरड बंद करा नाहीतर थप्पड खाल आणि तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. त्यांना बाहेर काढा’, अशा शब्दांत गडकरी यांनी आपला राग व्यक्त केला.

नागपुरातील एका जाहीर सभेदरम्यान गडकरींचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

हे कार्यकर्ते ‘स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे’, ‘जय विदर्भ’ अशा घोषणा देत होते. त्यामुळे गडकरींना मध्येच भाषण थांबवावं लागलं. शिवाय या आंदोलकांनी उपस्थित मीडियासमोर  पत्रके भिरकावली. हे पाहून गडकरी प्रचंड संतापले. त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र हे आंदोलक शांत होत नाहीत हे पाहून गडकरींना राग अनावर झाला. ते गोंधळ थांबवत नसतील तर त्यांना थप्पड लगावा आणि बाहेर काढा, असं गडकरी माईकवरुन म्हणाले. मात्र, तरी देखील कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.

आवाज केला तर ठोकून काढू, बस खाली, असा गडकरी संतापाने म्हणाले.