नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी, धैर्यशील मानेंचा हल्लाबोल

| Updated on: Nov 10, 2020 | 10:12 AM

यावेळी बोलताना त्यांनी अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरूनही भाजपवर निशाणा साधला आहे.

नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी, धैर्यशील मानेंचा हल्लाबोल
Follow us on

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. अशात आता सर्वच स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागली आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार (Shivsena mp) धैर्यशील माने ( dhairyasheel mane) यांनी भाजपवर (Bjp) घणाघाती टीका केली आहे. ‘बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा पराभव आहे. या पराभवचे वाटेकरी नितीश आणि मोदी असणार आहेत.’ असं ठाम मत धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आहे. ते दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. (Nitish Kumar and Prime Minister Narendra Modi have lost in Bihar said by dhairyasheel mane)

यावेळी बोलताना त्यांनी अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरूनही भाजपवर निशाणा साधला आहे. बिहार निवडणुकीमध्ये सुशांत सिंग राजपूत हा मुद्दाच नव्हता. परंतु, भाजपने हा मुद्दा बनवला. पण आता महाराष्ट्रातून बिहारमध्ये परिवर्तनची लाट गेली आहे. तेजस्वी यादव यांच्या रूपाने बिहारमध्ये परिवर्तन आलं. आता संपुर्ण देशात परिवर्तन येईल असा विश्वास धैर्यशील माने यांनी दाखवला आहे.

इकतंच नाही तर ‘महाराष्ट्रामध्ये कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला नाही तर न्याय मिळवून दिला जातो. बिहारमध्येही असंच होणार. भाजपने छोट्या पक्षाला सोडलं परंतु काँग्रेस पक्षाने सर्व छोट्या पक्षांना सोबत घेतलं. भविष्यात काँग्रेस पक्ष मोठ्या आघाडीने वाढणार आहे. राहुल गांधी यांच्यावर अनेकांचा विश्वास आहे.’ असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बिहार निवडणुकांवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्विट करून भाजपला चिमटे काढले आहेत. बादशाह तो वक्त होता है… इन्सान तो युं ही गुरुर करता है, असा टोला राऊत यांनी भाजपला नाव न घेता लगावला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या या ट्विटमुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. (Nitish Kumar and Prime Minister Narendra Modi have lost in Bihar said by dhairyasheel mane)

महाआघाडी आघाडीवर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्यात आरजेडी 27, काँग्रेस 6, जेडीयू 11 आणि भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यांच्या घरासमोर जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) पारंपरिक मतदारसंघ असलेल्या राघोपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तेजस्वी यादव यांची सध्याची लोकप्रियता पाहता राघोपूरमधून ते विक्रमी मताधिक्याने विजयी होणार का, हे पाहावे लागेल.

इतर बातम्या – 

Bihar Election Result Live Update: बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही: संजय राऊत

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारच्या हायप्रोफाईल लढतींकडे देशाचं लक्ष, कुठे-कुठे कांटे की टक्कर?

(Nitish Kumar and Prime Minister Narendra Modi have lost in Bihar said by dhairyasheel mane)