उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग कोमात, सत्तेची सूत्रे बहिणीकडे, भावापेक्षा बहीण जास्त क्रूर

| Updated on: Aug 24, 2020 | 11:33 PM

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग कोमात गेला आहे (Kim Jong-un in Coma).

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग कोमात, सत्तेची सूत्रे बहिणीकडे, भावापेक्षा बहीण जास्त क्रूर
Follow us on

प्योंगयांग (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग कोमात गेला आहे (Kim Jong-un in Coma). दक्षिण कोरियाच्या मीडियानं ही बातमी दिली आहे. उत्तर कोरियासोबत दक्षिण कोरियाचं वैर असलं, तरी मागच्या महिन्यभरापासून किम जोंग दिसलेला नाही. त्यामुळे दक्षिण कोरियातून आलेल्या बातमीत तथ्य असल्याचं बोललं जातंय (Kim Jong-un in Coma).

किम जोंग कोमात गेल्यानंतर त्याची बहिण मात्र फॉर्मात आली आहे. भाऊ किम जोंगच्या गैरहजेरीत तीच बहिण उत्तर कोरियाची मालकीण बनली आहे. तिचं नाव किम यो जोंग असं आहे. किम जोंगती 32 वर्षीय बहीण दिसायला नायिका असली तरी प्रत्यक्षात मात्र खलनायिका आहे. ती भाऊ किम जोंगपेक्षा कैकपट जुलमी आणि क्रूर आहे.

किम जोंगने 15 दिवसांपूर्वी वेश्याव्यवसायाच्या आरोपात 6 तरुणींवर गोळ्या झाडण्याचं फर्मान काढलं. या निर्णयामागेसुद्धा किम जोंगची बहिण किम यो जोंगचाच हात होता. भाऊ किम जोंगच्या पाठिशी किम यो जोंग नेहमी सावलीसारखी उभी राहिली आहे. ती किम जोंगपेक्षा वयानं तीन वर्ष लहान आहे. मात्र, ती अनुभव आणि कुटनीतीत किम जोंगपेक्षाही कणभर सरस आहे.

हेही वाचा : क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या महिलेपुढे चिनी सरकार हादरलं, काई शिया यांनी जिनपिंग विरोधात बंड पुकारलं

किम यो जोंग एका हुकूमशहाची बहीण असूनही प्रचंड लो प्रोफाईल आहे. पडद्यामागून तिच किम जोंगचा सर्व कारभार पाहते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट असो किंवा इतर कोणत्याही देशाचा दौरा, आंतरराष्ट्रीय मीडियात किम जोंगची प्रतिमा रंगवण्याची सर्व जबाबदारी तीच पार पाडत होती.

उत्तर कोरियाच्या जन्मपाासून तिथं किम घराण्याची सत्ता आहे. नेत्याच्या मृत्यूशिवाय तिथं कधीच सत्तेचं हस्तांतरण होत नाही. परंपरेप्रमाणे तिथं किम घराण्याचा थोरला मुलगाच पुढचा हुकूमशहा होतो. मात्र किम जोंगला 3 मुलं आहेत. यापैकी सर्वात मोठा मुलगा फक्त 10 वर्षांचा आहे. त्याला नामधारी म्हणून जरी गादीवर बसवलं, तरी अराजक माजण्याची भीती आहे. त्यामुळेच किम जोंगनं सत्तेच्या चाव्या बहिणीच्या हाती सोपवल्या आहेत.

किम जोंगची तीन मुलं कशी दिसतात? ते कुठे शिकतात? याची उत्तरं कोरियातल्या जनतेलाही माहिती नाही. खुद्द किम जोंग जेव्हा परदेशातून शिक्षण घेऊन उत्तर कोरियात परतला होता तेव्हा तो किम घराण्याचा वंशज आहे, हेसुद्धा लोकांना पहिल्यांदा माहित झालं होतं. घातपाताच्या भीतीनं किम घराणं आपल्या कुटुंबाची माहिती कधीच समोर येऊ देत नाही.

काही दिवसांपूर्वी चिनी डॉक्टरांचं एक पथक उत्तर कोरियात येऊन गेलं. त्याच पथकानं किम जोंगवर उपचार केले. त्या पथकातल्या एका व्यक्तीच्या हवाल्यानं किम जोंग कोमात गेल्याची पहिली बातमी समोर आली. याच बातमीला उत्तर कोरियाच्याच एका अधिकाऱ्यानं दुजोराही दिला आहे. त्यामुळे सध्या उत्तर कोरियाची सर्वेसर्वा किम यो जोंग आहे. तिच्या क्रूरतेचे किस्से ती सत्तेत येण्याआधीपासून चर्चेत आहेत. भावाच्या तावडीतून देश जरी सुटला, तरी तो आता बहिणीच्या ताब्यात गेला आहे.