‘छोटी मालकीण’च्या सेटवर नर्सिंगच्या विद्यार्थिनी

मुंबई:  स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. याच प्रेमाची पोचपावती देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी नुकतीच या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणं हा आनंद त्यांना सुखावणारा होता. त्यासाठी शहापूर ते मढ असा प्रवास करत ही मंडळी […]

'छोटी मालकीण'च्या सेटवर नर्सिंगच्या विद्यार्थिनी
सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई:  स्टार प्रवाहवरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. याच प्रेमाची पोचपावती देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी नुकतीच या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणं हा आनंद त्यांना सुखावणारा होता. त्यासाठी शहापूर ते मढ असा प्रवास करत ही मंडळी सेटवर पोहोचली आणि छोटी मालकीणच्या कलाकारांसोबत एकत्र जेवणाचा आनंद लुटला.

शहापूर जवळील सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील या विद्यार्थीनी ‘छोटी मालकीण’ ही मालिका न चुकता पाहतात. मालिकेवरील याच प्रेमापोटी त्यांनी कलाकारांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. ‘छोटी मालकीण’च्या सेटवर या लाडक्या चाहत्यांचं थाटात स्वागत करण्यात आलं.

शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत कलाकारांनीही त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधला.

‘छोटी मालकीण’ मालिकेतील श्रीधर म्हणजेच अक्षर कोठारीला जेव्हा या खास चाहत्यांबद्दल कळलं तेव्हा तो खूपच आनंदीत झाला. एरव्ही चाहत्यांना भेटण्याची संधी आम्हा कलाकार मंडळींना खूप कमी वेळा मिळते त्यामुळे माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. ही आठवण मी कॅमेऱ्यात कैद करुन ठेवल्याची भावना अक्षरने व्यक्त केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें