साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्याची मिळणार संधी; अशी करा नावनोंदणी

| Updated on: Nov 10, 2021 | 3:12 PM

नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्याची संधी साहित्यिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्याची मिळणार संधी; अशी करा नावनोंदणी
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा लोगो.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्याची संधी साहित्यिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

नाशिक येथे 3 ते 5 डिसेंबर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्यासाठी नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जामध्ये संबंधित लेखक व प्रकाशकांची प्राथमिक माहिती आणि पुस्तकाबद्दल महत्त्वाचे तपशील विचारण्यात आलेले आहेत. याव्यतिरिक्त संबंधित लेखकाकडून एक हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे. ज्यामध्ये कॉपीराइट, प्रकाशनासंदर्भातील तांत्रिक बाबी आणि कोव्हिड-2019 संदर्भातील दक्षता यासंबंधीची हमी आहे. इतरत्र पुस्तक प्रकाशनांवर होणारा खर्च टाळण्याच्यादृष्टीने संयोजक याठिकाणी पुस्तक प्रकाशन मंचाची उभारणी करणार असून, त्यासाठी प्रकाशनाकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. येथे ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या सारस्वतांचा यथोचित सन्मान करणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, संयोजन समन्वयक विश्वास ठाकूर, कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील, भगवान हिरे आदींनी दिली आहे.

यांच्याशी साधा संपर्क

संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक- मान्यवर विचारवंतांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन ही एक संधी असून येथे उपलब्ध सोयी- सुविधांचा उपयोग करून घेत अधिकाधिक साहित्यिकांनी आपली पुस्तके प्रकाशित करण्याचे आवाहन ग्रंथ प्रकाशन समिती प्रमुख सुभाष सबनीस, उपप्रमुख प्रवीण जोंधळे, विजयकुमार मिठे, प्रकाश कोल्हे यांनी केले. नावनोंदणी प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी सुभाष सबनीस (9881248429), प्रशांत कापसे (9545415677), प्रवीण जोंधळे (9922946622), अलका कोठावदे (9420651911), प्रा. लक्ष्मीकांत भट (9226157040), रवींद्र रनाळकर (9403774562), सुकदेव डेरे (9822851179), कौस्तुभ मेहता (9225114212) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

उदघाटकांच्या नावावर विचार सुरू

साहित्य संमेलनाचे उदघाटन कुणाच्या हस्ते करायचे याचा विचार सुरू आहे. गायिका आशा भोसले, गीतकार आणि कवी गुलजार यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. सोबतच महानायक अमिताभ बच्चन आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या नावांचाही विचार सुरू आहे. दरम्यान, साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनपूर्व गुरुवारी 02 डिसेंबर रोजी सायं. 7.00 वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संमेलनस्थळी करण्यात आले आहे. (Opportunity to publish a book at Sahitya Sammelan in Nashik)

इतर बातम्याः

महापालिकेच्या प्राथमिक शाळांची सुट्टी वाढली; नाशिकमध्ये 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार वर्ग

Good News: रानवाटेवर केशराचा पाऊस; भारतात दुर्मिळ झालेल्या लाल मानेच्या ससाण्याचे घडले दर्शन!