Corona Vaccine | ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात, सिरम इन्स्टिट्यूटचा दावा

| Updated on: Jul 22, 2020 | 6:21 PM

डिसेंबरमध्ये कोरोनाची प्रतिबंधात्मक लस बाजारात येईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटने (Corona Vaccine Will Come In December Serum Institute claims) दिली. 

Corona Vaccine | ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात, सिरम इन्स्टिट्यूटचा दावा
Follow us on

पुणे : कोरोना विषाणूने जगात अक्षरश: धुमाकूळ घातला (Corona Vaccine Will Come In December Serum Institute claims) आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासंदर्भात जागतिक पातळीवर मोठे संशोधन सुरु आहे. भारतासह जगातील अनेक संस्था यासाठी अहोरात्र झटत आहे. ऑक्सफर्डबरोबर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचं ही योगदान आहे. ऑक्सफर्ड आतापर्यंत केलेल्या चाचण्यांना मोठे यश आले. त्यामुळे डिसेंबरमध्ये ही लस बाजारात येणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजीव ढेरे यांनी याबाबतची माहिती दिली.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फेज वनमधील आशादायक परिणाम आहे. तसेच ही चाचणी सुरक्षित असून आवश्यक परिणामकारक आहे. त्यामुळे लस विकसित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ऑगस्ट महिन्यात माणसांवर या लसीची ट्रायल होईल. साधारण पंधराशे ते दोन हजार लोकांवर ही ट्रायल होईल. मात्र एकीकडे चाचण्या सुरु असतानाच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीचे उत्पादनही सुरु असल्याचं राजीव ढेरे यांनी सांगितलं.

भारतात माणसांवरील चाचण्यांचे रिझल्ट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतील. याच दरम्यान यूकेमधील चाचण्यांचे रिझल्ट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतील. आमची उत्पादने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होईल. म्हणजेच येत्या डिसेंबरमध्ये ही लस उपलब्ध होईल, असा दावा राजू ढेरे यांनी केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या चाचण्यांमध्ये पहिली चाचणी औषधाची सुरक्षितता पाहिली जाते. त्यांना कोणाला अपाय होत आहे. जो परिणाम साधायचा तो साधला जातो की नाही. यासाठी रक्ताचे नमुने काढले जातात. माणसाच्या शरीरात अँटी-बॉडीज तयार होतात. व्हायरस आला की ते अटॅक करतात आणि ते काढून टाकतात. पहिल्या चाचणीतील दोन टप्पे यशस्वी झाले आहेत. पुढचे टप्पे पण यशस्वी होतील, असा आशावाद राजीव ढेरे यांनी व्यक्त केला आहे.

सध्या चाचण्या चालू आहेत. त्या मोठ्या प्रमाणात होतील. 22 हजार लोकांवर पुढे चाचण्या होतील. त्याच बरोबर दुसऱ्या टप्प्यात त्याची निर्मिती होईल. या चाचण्यात चालू असताना निर्मिती सुद्धा सुरु आहे. निर्मिती हा एक मोठा भाग आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कोरोना हा जगातला नवीन विषाणू आहे. या व्हायरसची माहिती केवळ सहा महिन्याचे आहे. त्यामुळे जे काही करायचे ते लवकर करणं गरजेचं होतं. माहिती कमी आहे आहे. त्या माहितीवर आणि अनुभवावर त्वरित निर्णय घेऊन धोका घेऊन काम सुरु आहे.

डिसेंबरपर्यंत कोट्यावधी डोसची निर्मिती होईल. भारतामध्ये डिसेंबरमध्ये या लसीची लायसन प्रक्रिया पूर्ण होईल. या प्रकारानंतर डिसेंबरमध्ये लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचं राजीव ढेरे यांनी (Corona Vaccine Will Come In December Serum Institute claims) सांगितलं.

संबंधित बातम्या : 

गुड न्यूज | ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी, लसीमुळे दुहेरी संरक्षण

Maharashtra Corona Update | पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर