REVIEW : आशुतोष गोवारीकरांच्या ‘पानिपत’चे अनेक रिव्ह्यूज एकाच ठिकाणी

टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स नाऊ, बॉम्बे टाइम्स, ईटाइम्स, झूम टीव्ही यासारख्या हिंदी-इंग्रजी वेब पोर्टल्सनी 'पानिपत' चित्रपटाला साडेतीन स्टार्स दिले आहेत

REVIEW : आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत'चे अनेक रिव्ह्यूज एकाच ठिकाणी
Follow us
| Updated on: Dec 05, 2019 | 3:43 PM

मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित भव्यदिव्य ऐतिहासिक महानाट्य ‘पानिपत’ चित्रपटाचा समीक्षकांसाठी विशेष खेळ पार पडल्यानंतर विविध वेबसाईट्सनी आपले रिव्ह्यू (Panipat Movie Review) शेअर केले आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ‘पानिपत’ला साडेतीन स्टार्स दिले आहेत.

‘पानिपत’ हा चित्रपट मनाची पकड घेतो. मराठा साम्राज्याच्या शौर्याला सलाम करणारा चित्रपट. पहिला भाग काहीसा विस्कळीत असला, तरी उत्तरार्ध उत्तम आहे. लढाईचे सीन्स लाजवाब आहेत. संजय दत्त खूंखार, अर्जुन कपूर प्रभावी, तर क्रिती सॅनन उत्कृष्ट असल्याचं तरण आदर्शनी लिहिलं आहे.

टाइम्स ऑफ इंडिया, टाइम्स नाऊ, बॉम्बे टाइम्स, ईटाइम्स, झूम टीव्ही यासारख्या हिंदी-इंग्रजी वेब पोर्टल्सनी ‘पानिपत’ चित्रपटाला साडेतीन स्टार्स दिले आहेत, तर खलीज टाइम्सने तीन स्टार्स दिले आहेत.

‘अर्जुन कपूरने आपली भूमिका प्रामाणिकपणे वठवली आहे. युद्धाच्या दृश्यांमध्ये तो लक्षवेधी ठरतो. तर क्रिती सॅननसोबतच्या रोमँटिक दृश्यातही तो प्रभावी दिसतो’ असं टाइम्स ऑफ इंडियाच्या रिव्ह्यूमध्ये म्हटलं आहे. चित्रपटाची भव्यदिव्यता प्रत्येक दृश्यात उठून दिसत असल्याचंही यात म्हटलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि संगीताला प्रत्येकी साडेतीन स्टार्स, तर कथा-संवादांना प्रत्येकी तीन स्टार्स देण्यात आले आहेत.

अर्जुन कपूरने त्याच्यावर सोपवलेली भूमिका चोख केली आहे. कृती सॅनन आऊटस्टँडिंग आहे, तर संजय दत्तचा करिष्मा भव्य पडद्यावर दिसतो, असं ‘झूम टीव्ही’ने रिव्ह्यूमध्ये (Panipat Movie Review) म्हटलं आहे.

अनेक चित्रपटांचे वाभाडे काढणार अभिनेता आणि चित्रपट समीक्षक केआरके उर्फ कमाल आर खान यानेही पानिपतला तीन स्टार देत, चित्रपट आवर्जून पाहण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील बहुतांश संवाद मराठीत असल्याचा उल्लेख केआरकेने केला आहे. सिनेमातील गाणी श्रवणीय, भव्य आणि रंगीत आहेत. लोकेशन्सही उत्तम आहेत. गोवारीकरांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच पानिपतची लांबी तीन तासांच्यावर असून काही दृष्यांना कात्री लावता आली असती, असं कमाल खानचं मत आहे. संजय दत्त शोभून दिसतो, तोच सिनेमाचा खरा हिरो आहे, अर्जुनने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. क्रिती सॅननचा परफॉर्मन्सही वाखाणण्यासारखा आहे, असं केआरके म्हणतो.

‘पानिपत’ 6 डिसेंबरला भेटीला

‘पानिपत’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट उद्या म्हणजेच शुक्रवार 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आशुतोष गोवारीकरांच्या खांद्यावर या ऐतिहासिक चित्रपटाची धुरा असल्यामुळे मराठी भाषिकांमध्येही सिनेमाविषयी उत्सुकता आहे.

‘हा’ हिंदी चित्रपट पाहाच, राज ठाकरेंचं आवाहन

‘पानिपत’ चित्रपटात सदाशिवराव भाऊ यांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सॅनन तर अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त पाहायला मिळणार आहे. मोहनीश बहल, शरद केळकर, पद्मिनी कोल्हापुरे, नवाब शाह आणि झीनत अमनही मुख्य भूमिकेत आहेत. अजय- अतुल यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. लगान, स्वदेस, जोधा अकबर सारखे तगड चित्रपट देणाऱ्या गोवारीकरांकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

‘पानिपत’ हा चित्रपट पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालं होतं. 1761 मध्ये हरियाणातील पानिपतच्या मैदानावर झालेल्या या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला.

Panipat Movie Review

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.