पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार

क्वारंटाईन सेंटरमध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर आरोपीने बलात्कार केला

पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार
| Updated on: Jul 17, 2020 | 5:13 PM

पनवेल : पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्वारंटाईन असलेल्या एका युवकानेच बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप आहे (Panvel Quarantine Center Woman Rape)

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी झगडते आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. यानुसारच पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयित किंवा हाय रिस्क व्यक्तींना क्वारंटाईनची व्यवस्था कोण येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. या इमारतीतच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

गुरुवारी मध्यरात्री संबधित प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. क्वारंटाईन सेंटरमध्येच कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर आरोपीने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या 

 टीव्हीवर पाहून लहान भावाची हत्या, मृतदेह पुरला, पावसामुळे हत्येचं गुपित उलगडलं

नागपुरात कौटुंबिक कलाहातून निर्दयी बापाकडून 9 महिन्याच्या मुलीची पाण्यात बुडवून हत्या

(Panvel Quarantine Center Woman Rape)