Chandrapur Crime | टीव्हीवर पाहून लहान भावाची हत्या, मृतदेह पुरला, पावसामुळे हत्येचं गुपित उलगडलं

फिल्मी पद्धतीने गुन्हे करण्याच्या योजना पाहून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली

Chandrapur Crime | टीव्हीवर पाहून लहान भावाची हत्या, मृतदेह पुरला, पावसामुळे हत्येचं गुपित उलगडलं

चंद्रपूर : टीव्हीवरील गुन्हे विषयक मालिका आणि फिल्मी पद्धतीने गुन्हे करण्याच्या योजना पाहून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली. खून केल्यानंतर या निर्दयी मोठ्या भावाने लहान भावाचा मृतदेह फिल्मी स्टाईलने पुरला. चंद्रपूर शहराजवळच्या दुर्गापूर परिसरात हा धक्कादायक प्रकार उजेडात आला (Chandrapur Crime Elder Brother Murder Younger Brother).

दुर्गापूरच्या वेताळ चौक भागात वास्तव्याला असलेल्या रामटेके कुटुंबातील 2 सख्ख्या भावांची कहाणी दुर्दैवी आणि फिल्मी स्टाईल हत्येचा नमुना ठरली आहे. रामटेके कुटुंब वास्तव्याला असलेल्या भागातील सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्याला दिली. जमिनीवर कवेलू पसरुन असलेल्या एका विशिष्ट ठिकाणी जमिनीतून एक मानवी हात बाहेर आला असल्याचंही नागरिकांनी पोलिसांना सांगितलं. ही माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यानंतर तहसीलदारांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यांच्या उपस्थितीत हा खड्डा पुन्हा एकदा खणण्यात आला. या खड्ड्यातून या भागात 10 ते 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अनिकेत विपुल रामटेके या 17 वर्षीय मुलाचा हा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गुप्त सूचना काढून या हत्येमागे कोण असावे, याचा कयास बांधला. तेव्हा अनिकेतचा 21 वर्षीय मोठा भाऊ अंकित बेपत्ता असल्याचे उघड झाले (Chandrapur Crime Elder Brother Murder Younger Brother).

एकीकडे अनिकेत बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार आणि दुसरीकडे पुरलेला मृतदेह काढताच बेपत्ता झालेला सख्खा मोठा भाऊ, यात पोलिसांनी कनेक्शन स्थापित केले.

टीव्हीवर पाहून फिल्मी स्टाईलने खून

खबऱ्यांचे जाळे विणून लपून बसलेल्या अंकित रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने आपणच आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून केल्याचं कबुल केलं. टीव्ही वाहिन्यांवरील गुन्हे विषयक मालिका बघून या खुनाचा कट रचण्यात आला होता. आपल्या प्रेयसीची छेड काढली म्हणून अंकितने सख्ख्या लहान भावाचा काटा काढल्याचं कबुल केलं.

त्यानुसार, सत्यवान रामटेके यांच्या पडक्या घरात अंकितने अनिकेतला दारु पाजली आणि तो नशेत असताना त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिथेच त्याचा मृतदेह पुरला. मृतदेह लवकर कुजावा यासाठी युरिया आणि इतर साहित्य देखील या खड्ड्यात टाकण्यात आलं होतं. एवढेच नव्हे, तर आरोपी अंकितने एका कुत्र्याला मारुन त्याला याच घटनास्थळी फेकले. ज्यामुळे दुर्गंधीविषयी लोकांची दिशाभूल झाली.

मात्र, मुसळधार पावसाने 15 दिवसांनी हा बनाव उजेडात आला. पोलिसांना घटनास्थळी मृतदेह कुजण्यासाठी आवश्यक साहित्यासह डांबर गोळ्याही आढळून आल्या आहेत. हा खड्डा मृत अनिकेत आणि आरोपी अंकित यांनी मिळून अवैध दारु विक्रीसाठीच्या बाटल्या लपवण्यासाठी खोदला असल्याचाही खुलासा अंकितने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंकितला ताब्यात घेतले असून 24 तासात हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

Chandrapur Crime Elder Brother Murder Younger Brother

संबंधित बातम्या :

सांगलीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, पाठलाग करुन धारदार शस्त्राने हल्ला

आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग अश्लील फोटो, पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत जाळं, बारामतीच्या तरुणाला बेड्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *