चोरट्यांनाही कोरोनाची धास्ती, पुण्यात मास्क लावून चोरी करणाऱ्या दोघांना अटक

विकास कांबळे आणि सर्फराज शेख अशी या दोन गुन्हेगारांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली (Pune Theft Robbery with Help Of Mask) आहे.

चोरट्यांनाही कोरोनाची धास्ती, पुण्यात मास्क लावून चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक (Pune Theft Robbery with Help Of Mask) आहे. मात्र आता चोरटेही कोरोनाच्या धास्तीने मास्क लावूनच चोरी करत आहेत. मास्क लावल्यानं कोरोनाची भीती तर टळत आहे. मात्र पोलिसांपासून ओळख लपवण्यासाठी ही त्यांना मास्कची मदत होत आहे.

पुण्यातील अशा दोन सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. विकास कांबळे आणि सर्फराज शेख अशी या दोन गुन्हेगारांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तडीपार असतानाही चोरटे घरफोडी करत होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी तब्बल आठ घरफोड्या केल्या होत्या. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात चोर्‍यांचं प्रमाण वाढलं होतं. या चोरट्यांच्या रडारवर लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेली औषध आणि किराणा दुकान होती.

पिंपरीतून पुण्यात येऊन चोरटे आपला डाव साधत होते. याबाबतचं सीसीटीव्ही सुद्धा पोलिसांच्या हाती लागला होतं. मात्र मास्क असल्यानं चोरट्यांची ओळख पटवण्यास अडचणी येत होत्या. माञ अखेर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. यातील विकास कांबळे हा जिल्ह्यातून तडीपार आहे. या आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, लूटमार, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी पिंपरी आणि कोथरूड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात फरार (Pune Theft Robbery with Help Of Mask) होते.

संबंधित बातम्या : 

‘लंडनच्या जावया’ने मुंबईकर कुटुंबाला लुबाडले, लग्न जुळवून 7.89 लाखांना गंडा

शेजाऱ्यांशी भांडणाचा जाब विचारल्याने राग, वडील आणि भावाची चाकूने हत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *