शेजाऱ्यांशी भांडणाचा जाब विचारल्याने राग, वडील आणि भावाची चाकूने हत्या

पोटच्या मुलानेच जन्मदात्या पित्याची आणि आपल्या लहान भावाची धारदार शस्त्राने निर्घृण (Jalgaon Nandra Murder Case) हत्या केली आहे.

शेजाऱ्यांशी भांडणाचा जाब विचारल्याने राग, वडील आणि भावाची चाकूने हत्या

जळगाव : क्षुल्लक कारणामुळे पोटच्या मुलानेच जन्मदात्या पित्याची आणि आपल्या लहान भावाची धारदार शस्त्राने निर्घृण (Jalgaon Nandra Murder Case) हत्या केली आहे. जळगावातील पहूरपासून जवळच असलेल्या नांद्रा गावात ही घटना घडली. यामुळे नांद्रा गावात खळबळ उडाली आहे.

नांद्रा गावात निलेश नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो पूर्णपणे रोजंदारीवर काम करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे तो आपल्या गावी अडकला होता. तर त्याचा लहान भाऊ महेंद्र हा जळगावच्या चटई बनवण्याच्या कंपनीत कामाला होता. मात्र तोही पत्नीसह गेल्या 6 महिन्यांंपासून कुसुंबा येथे राहत होता. मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने तोही पत्नी अश्विनीसोबत नांद्रा येथील घरी राहायला आला होता.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

काही दिवसांपूर्वी निलेशचे शेजारच्या लोकांशी भांडण झाले. त्यावेळी त्याचे वडील आनंद पाटील आणि लहान भाऊ महेंद्र यांनी निलेशला शेजाऱ्यांशी का भांडतोस याबाबत जाब विचारला. त्यावेळी त्याला वडीलांनी आणि भावाने थोडी मारहाण केली. त्यानंतर शेजाऱ्यांसोबत भांडण मिटवत घरी (Jalgaon Nandra Murder Case) आणले.

मात्र वडीलांनी आणि भावाने मारहाण केलेल्याचा राग निलेशच्या डोक्यात होता. या रागात आई-वडील बाहेर झोपले असताना निलेशने घरातील चाकूने जन्मदात्या पित्यावर वार केले. वडिलांचा आक्रोश ऐकून बाहेर लहान भाऊ महेंद्र आणि त्याची पत्नी अश्विनी धावत आले. त्याचवेळी निलेशने महेंद्रवरही चाकूने वार करत निर्घृण हत्या केली.

या घटनेनंतर महेंद्र यांची पत्नी अश्विनी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आरोपी निलेश आनंद पाटील याला ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. निलेश पाटील याच्याविरोधी 201 अन्वये भादवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला (Jalgaon Nandra Murder Case) आहे.

संबंधित बातम्या : 

आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग अश्लील फोटो, पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत जाळं, बारामतीच्या तरुणाला बेड्या

चार वर्षांच्या अफेअरनंतर विवाह, तीन दिवसात पतीची ट्रेनखाली उडी, पत्नीचाही गळफास

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *