फी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार

| Updated on: Oct 20, 2020 | 5:07 PM

कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींची पगारकपात झाली, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे पालक वर्गाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे (Parents protest in Titwala for fee waiver).

फी माफीसाठी टिटवाळ्यात पालकांचा ठिय्या, स्थानिकांच्या थाळीनादानंतर शाळेची माघार
Follow us on

ठाणे : कल्याणच्या टिटवाळा भागात मेरीडीयन शाळा प्रशासन आणि पालक वर्ग यांच्यात विद्यार्थ्यांची फी माफी करावी यासाठी चांगलीच झुंपली होती. फी माफीसाठी स्थानिक भाजप नगरसेविकेने तीन-चार पालकांसह शाळेसमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनास आजूबाजूच्या सोसायटीतील नागरीकांनी थाळीनाद करीत समर्थन दिलं. त्यामुळे अखेरीस शाळेला नमतं घ्यावं  लागलं. शाळेने विद्यार्थ्यांची फी 30 टक्के कमी केली आहे (Parents protest in Titwala for fee waiver).

शाळेची फी कमी करावी यासाठी टिटवाळ्याच्या मेरीडीयन शाळा प्रशासन आणि पालक वर्ग यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु होते. कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींची पगारकपात झाली, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे पालक वर्गाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अशा परिस्थितीत फी कुठून भरायची? असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. त्यामुळे शाळेने फी कमी करावी, अशी मागणी शाळा प्रशासनाकडे केली होती.

याप्रकरणी माजी उपमहापौर भाजप नगरसेविका उपेक्षा भोईर आणि भाजप पदाधिकारी शक्तीवान भोईर यांनी फी कमी करण्यासाठी टिटवाळ्यातील सर्व शाळांना विनंती केली होती. मेरीडीयन शाळा व्यवस्थापनासोबत पालक आणि नगरसेविकेची बैठकही झाली. मात्र शाळा नरमाईची भूमिका घेण्यास तयार नव्हती (Parents protest in Titwala for fee waiver).

अखेर आज उपेक्षा भोईर आणि पालक एका ठिकाणी जमा झाले. पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी नसल्याने पालकांमधून तीन जण, समाजसेवेक प्रफूल शेवाळे आणि नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनास शाळा परिसरातील सर्व इमारतीतील रहिवाशांना घराच्या गॅलरीत येऊन थाळीनाद करुन जोरदार समर्थन दिले.

नागरीकांचे समर्थन पाहून शाळेसह पोलीस प्रशासनही थक्क झाले. अखेर आंदोलकांच्या मागणीला यश आले. शाळा प्रशासनाने पहिल्या सहा महिन्यात 30 टक्के आणि दुसऱ्या सहा महिन्यात 25 टक्के फी कमी केली. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आंदोलनास समर्थन दिलेल्या सर्व नागरीकांचे पालक आणि नगरसेविकेने आभार मानले.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन