AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fight VIDEO: बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यात का झालं भांडण? इतर खेळाडूंनी केली मध्यस्थी

AUS vs ENG, 3rd Test: एशेज कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत दिसत आहे. दुसरीकडे पहिल्या डावातील धावा गाठताना इंग्लंडची दमछाक झाली. दरम्यान, या कसोटीत स्टोक्स आणि आर्चर यांच्यात तू तू मैं मैं झाली.त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Fight VIDEO: बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यात का झालं भांडण? इतर खेळाडूंनी केली मध्यस्थी
Fight VIDEO: बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यात का झालं भांडण? इतर खेळाडूंनी केली मध्यस्थीImage Credit source: Getty Images
| Updated on: Dec 18, 2025 | 3:55 PM
Share

Ben Stokes- Jofra Archer Fight: एशेज कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यातच मालिका गमवण्याचं संकट आता इंग्लंडवर आलं आहे. कारण या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने इंग्लंडने गमावले आहेत. सध्या ऑस्ट्रेलिया 2-0 अशी आघाडीवर आहे. तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पाच सामन्यांची कसोटी मालिका हातून जाईल. असं असताना या सुमार कामगिरीचं प्रभाव आता इंग्लंड संघावर दिसत आहे. त्याचा दबाव आता खेळाडूंवर स्पष्टपणे दिसून येत आहे. इंग्लंडचा कर्णधार आणि खेळाडूंमध्ये शा‍ब्दिक चकमक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लाईव्ह सामन्यात बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भिडल्याचं दिसत आहे. त्यामुळे इतर खेळाडूंना मध्यस्थी करणं भाग पडलं. एडिलेड कसोटीच्या दुसर्‍या दिवसाच्या खेळादरम्यान बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल झालेला व्हिडीओ या सामन्यातील पहिल्या दिवसाचा आहे.जेव्हा ऑस्ट्रेलियाने 1 गडी गमवून 48 धावा केल्या होत्या.

व्हायरल व्हिडीओतील हावभाव पाहता हे भांडण स्टोक्स आणि जोफ्रामध्ये क्षेत्ररक्षणावर झाल्याचं दिसत आहे. आर्चरने स्टोक्सने लावलेल्या क्षेत्ररक्षणावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे. त्याचीच तक्रार तो करत असल्याचं दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी असा अंदाज बांधला आहे की, स्टोक्स त्याला सांगतोय की जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची तक्रार करू नको. स्टंपवर चेंडू टाकत जा. त्यानंतर आर्चरनेही आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यामुळे हा वाद वाढत असल्याचं पाहून इतर खेळाडू मध्यस्थीसाठी धावले. त्यांनी स्टोक्स आणि आर्चर यांच्यातलं भांडण सोडवलं.डकेटने आर्चरचा राग शांत केल्याचं दिसत आहे.

बेन स्टोक्सबरोबर भांडण झाल्यानंतर आर्चरचं रौद्र रूप पाहायला मिळालं. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या पाच खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. 2019 नंतर त्याला पहिल्यांदा मोठं यश मिळालं आहे. आर्चरने आपल्या गोलंदाजीतून स्टोक्सला उत्तर दिल्याचं आता बोललं जात आहे. दुसरीकडे, इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 371 धावांचा पाठलाग करताना 213 धावांवर 8 विकेट गमावल्या आहेत. अजूनही इंग्लंड पिछाडीवर आहे. जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स मैदानात आहेत. जोफ्रा आर्चर नाबाद 30, तर बेन स्टोक्स नाबाद 45 धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये 45 धावांची भागीदारी झाली आहे. आता तिसऱ्या दिवशी कसा खेळ करतात याकडे लक्ष लागून आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी