AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशील कुमार शिंदे यांच्या गडात काँग्रेसला खिंडार… माजी आमदाराने तडकाफडकी पक्ष सोडला; थेट…

Solapur Politics : ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराने असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपाची ताकद वाढली आहे.

सुशील कुमार शिंदे यांच्या गडात काँग्रेसला खिंडार... माजी आमदाराने तडकाफडकी पक्ष सोडला; थेट...
Dilip ManeImage Credit source: X
| Updated on: Dec 18, 2025 | 4:12 PM
Share

राज्यात सध्या महानगर पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अनेक पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणूकीची तयारी सुरू असताना आता अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीचीही घोषणा झाली आहे. आता या ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराने असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. हा नेता नेंमका कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. आता याच बालेकिल्ल्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. याचा परिणाम थेट आगामी महानगर पालिकेवर होण्याची शक्यता आहे.

माजी नगरसेवकांचाही भाजपमध्ये प्रवेश

माजी आमदार दिलीप माने यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, माजी नगरसेवक दादाराव ताकमोगे, सोलापूर बाजार समितीचे प्रथमेश पाटील, माने सहकारी बँकेचे संचालक आनंद देटे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने, साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय भोसले, नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.सतीश दरेकर, सोलापुरचे उद्योजक श्रीकांत मेलगे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही काळापासून रंगली होती. माने यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे माने यांचा पक्षप्रवेश काही काळ लांबला होता. मात्र आता त्यांनी अनेक माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.