AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवले, आता फक्त ‘इतका’ कर लागणार

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 25 % वरून 18% पर्यंत कमी केले आहेत. आता भारतावर फक्त 18% कर असणार आहे. यामुळे निर्यातदारांना फायदा होणार आहे.

सर्वात मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवले, आता फक्त 'इतका' कर लागणार
Trump trImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 02, 2026 | 11:08 PM
Share

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. अमेरिकेने भारतावरील टॅरिफ 25 % वरून 18% पर्यंत कमी केले आहेत. आता आगामी काळात टॅरिफ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात या मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण करार झाला. याबाबत बोलताना ट्रम्प यांनी कर 18% वरून शून्यावर आणण्याबाबत भाष्य केले आहे. भारतासाठी हा मोठा दिलासा असणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले ट्रम्प?

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात आज फोनवरून संभाषण झाले. यावेळी दोन्ही नेत्यांना व्यापारासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, “पंतप्रधान मोदी हे माझे सर्वात चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या देशातील एक शक्तिशाली आणि आदरणीय नेते आहेत. आम्ही व्यापार आणि रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवणे यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.”

भारत आता रशियाकडून नव्हे तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार – ट्रम्प

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार आहे. भारत आगामी काळात अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून इंधन खरेदी करणार आहे. तसेच भारत अमेरिकेकडून जवळपास सर्वच वस्तूंची खरेदी करेल असंही ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात भारतावरू शुल्क आणखी कमी केले जाईल अशी माहिती देताना, सध्या कमी केलेले शुल्क दर त्वरित लागू होतील असंही ते म्हणाले. भविष्यात भारताशी आमचे संबंध आणखी मजबूत होतील. पंतप्रधान मोदी आणि मी अनेक सकारात्मक कामे पूर्ण करणार आहोत.

भारत अमेरिकेकडून मोठी खरेदी करणार

ट्रम्प पुढे म्हणाले की, मोदी यांनी बाय अमेरिकन धोरणाला खूप उच्च पातळीवर नेण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. भारत अमेरिकेकडून 500 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त किमतीची ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती, कोळसा आणि इतर अमेरिकन उत्पादने खरेदी करेल. आगामी काळात भारतासोबतचे आमचे अद्भुत संबंध अधिक मजबूत होतील.

Follow Us
संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल
Video: प्रदीप पूर्णेकर प्रकरण... संजय राऊतांवर निशाणा साधत ज्योती वाघमारे यांचा हल्लाबोल, 'जिथे राजकारण दिसतं तिथेच राऊत का जातात?'
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची...
उद्धव ठाकरे पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीला; मुलगा म्हणाला, जीवाची भीती, धमक्यांचा दावा...
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं