AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोणावळा येथे ३९० फूट दरीत कोसळून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू , दहा तासांनी मृतदेह सापडला

नवी मुंबईतून लोणावळ्याच्या टायगर पॉईंट येथे ट्रेकला गेलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा ३९० फूट दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणीचा मृतदेह शोधण्यासाठी दहा तासांचा वेळ लागला असून तिचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

लोणावळा येथे ३९० फूट दरीत कोसळून १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू , दहा तासांनी मृतदेह सापडला
lonavala
| Updated on: Feb 02, 2026 | 10:40 PM
Share

लोणावळा येथील टायगर पॉईंट दरीत ट्रेकींगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा ड्युक नोज परिसरात दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.या तरुणीचा मृतदेह शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर ३९० फूट खोल दरीतून काढण्यात यश आले आहे. सकाळी ११.३० वाजता सुरु झालेली ही रेस्क्यू मोहिम रात्री ९.३० वाजता संपुष्ठात आली.

लोणावळ्याच्या टायगर पॉईंट दरीत घडलेली ही घटना प्रत्येकाला सुन्न करणारी ठरली आहे. नवीमुंबईहून ट्रेकींगसाठी आलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा ड्युक्स नोज परिसरात दरीत कोसळून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ३१ जानेवारी रोजी नवीमुंबईतील सीबीडी बेलापूर येथे राहणाऱ्या श्रेया नरेंद्र पती ही तरुणी लोणावळ्यात ट्रेकींगसाठी आली होती. श्रेया ही लॉची स्टुडन्ट होती. ती मुंबईच्या नामवंत कॉलेजात शिकायला होती. तिचे वडील सी.ए. आणि आई गृहिणी आहे.

ड्युक्स नोज परिसरात श्रेया ट्रेक करण्यासाठी ती गेली होती. मात्र संध्याकाळपर्यंत ती घरी परतली नाही. रात्री नातेवाईकांनी शोध घ्यायाला सुरुवात केली. शेवटी लोणावळ्यात चौकशी करण्यात आली. त्यावेळी ती या परिसरात आलेली होती आणि परत गेल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली.

१ फेब्रुवारी रोजी सकाळी नातेवाईकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात श्रेयाच्या मिसिंगची तक्रार नोंद केली.त्याचवेळी टायगर पॉईंट परिसरात सापडलेली बॅग ही श्रेयाचीच असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर सकाळी ११:३० वाजता रेस्क्यू टीमला शोध मोहिमेसाठी पाचारण करण्यात आले.ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर ३९० फूट खोल दरीतून श्रेयाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

भयंकर धोकादायक खोल दरी,अंधार आणि वेळेशी झुंज देत हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले.शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून दुपारी २:३० वाजता शोध मोहीम सुरू केली. डॉग स्क्वॉड, पोलीस ड्रोन आणि नंतर लाईटनिंग ड्रोनच्या सहाय्याने शोध सुरू असतानाच दुपारी ४:४५ वाजता सुमारे ३९० फूट खोल दरीत मुलीचा मृतदेह आढळून आला.

अंधार असतानाही अत्यंत कठीण परिस्थितीत दोरी, स्ट्रेचर आणि वॉकी-टॉकीच्या सहाय्याने मृतदेह सुरक्षितपणेवर काढण्यात अखेर यश आले. रात्री ९:३० वाजता श्रेयाचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही संपूर्ण शोध मोहीम पोलीस प्रशासनाच्या आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या धाडसाने यशस्वी झाली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी