शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल", असं आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं (Bacchu Kadu visits rain affected area )

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत, बांधावर जाऊन मंत्री बच्चू कडूंचं आश्वासन

अमरावती : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी पिकांची पाहणी करुन, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. “शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळेल”, असं आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं. (Bacchu Kadu visits rain affected area in Amravati)

बच्चू कडू यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतल्याने, शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. सर्वांना सरसकट नुकसान भरपाई मिळेल असं यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असून, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.

पंचनाम्याशिवाय अंतिम आकडा येणार नाही : सत्तार

दरम्यान, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज उस्मानाबादमध्ये पाहणी करुन, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्या ठिकाणी जास्त नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे झाल्याशिवाय अंतिम आकडा येणार नाही. सरसकट मदत मिळेल असे नाही, कारण नुकसान झाले आहे हे खरं असलं तरी ज्यांचे नुकसान झाले त्यांना मदत मिळेल असं अब्दुल सत्तार म्हणाले.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. 4 ते 5 दिवसात पंचनामे पूर्ण होतील. उस्मानाबाद जिल्ह्यात 40 हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भूमिका आहे, पंचनाम्या नंतर अंतिम आकडा आला की मदतीची घोषणा कॅबिनेटननंतर मुख्यमंत्री करतील, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

केंद्राने हक्काचे पैसे द्यावे : थोरात

कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक संकट आहे. त्यात अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे तो अद्याप केलेलाच नाही. परंतु सप्टेंबर अखेर राज्याचे हक्काचे असलेले जीएसटी परताव्याचे तब्बल ३० हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी आहेत ते तरी त्यांनी आधी द्यावेत, अशी मागणी महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

“माझं कुटुंब, माझी जबाबदारी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. पण आता फक्त भावनिक आवाहन करुन चालणार नाही. काम करायला हवं. सरकार चालवण्याचा जर दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर मग शेतकऱ्याला काय मदत करणार?”, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला

(Bacchu Kadu visits rain affected area in Amravati)

संबंधित बातम्या 

केंद्राने आधी राज्याच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत; बाळासाहेब थोरातांची मागणी   

तुमच्यात सरकार चालवण्याचा दम नसेल, तुम्ही रडत बसणार तर शेतकऱ्याला काय मदत करणार? : प्रवीण दरेकर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *