ट्रेनच्या वेळेपूर्वी 20 मिनिटे अगोदर पोहोचा, अन्यथा ट्रेन सोडा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सुरेक्षेच्या दृष्कोनातून सील रेल्वे स्थानक बनवण्याचा विर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता विनमातळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही 20 मिनिटांआधी पोहोचावं लागणार आहे. सील रेल्वे स्थानक म्हणजे असे रेल्वे स्थानक जिथे गाडी पकण्याआधी प्रवाशांची सुरक्षा तपासणी केली जाईल. देशात पहिल्यांदा ही व्यवस्था हाय टेक्नॉलॉजीसोबत अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आली आहे. कुंभ मेळाच्या […]

ट्रेनच्या वेळेपूर्वी 20 मिनिटे अगोदर पोहोचा, अन्यथा ट्रेन सोडा
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सुरेक्षेच्या दृष्कोनातून सील रेल्वे स्थानक बनवण्याचा विर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता विनमातळाप्रमाणे रेल्वे स्थानकांवरही 20 मिनिटांआधी पोहोचावं लागणार आहे. सील रेल्वे स्थानक म्हणजे असे रेल्वे स्थानक जिथे गाडी पकण्याआधी प्रवाशांची सुरक्षा तपासणी केली जाईल. देशात पहिल्यांदा ही व्यवस्था हाय टेक्नॉलॉजीसोबत अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आली आहे. कुंभ मेळाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने यात्रेकरु येथे पोहोचतात. याच महिन्यापासून कुंभ मेळ्याला सुरुवात होणार आहे.

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे डायरेक्टर जनरल अरुण कुमार यांनी पीटीआयला याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘कुंभ मेळ्यादरम्यान सुरेक्षेच्या दृष्टीकोनातून सध्या या हाय टेक्नॉलॉजी प्रकल्पाला अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आले आहे. तसेच लवकरच कर्नाटकच्या हुबळी स्थानकावरही ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. त्यासोबत 202 स्थानकांवर ही व्यवस्था लागू करण्यासाठी रेल्वेकडे ब्लू प्रिंट तयार आहे. 2016 साली रेल्वेच्या इंटीग्रेटेड सिक्यूरिटी सिस्टीम अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.’

‘ही व्यवस्था रेल्वे स्थानकांना सील करण्याची आहे. यामध्ये रेल्वे स्थानकांचे प्रवेश द्वार सील करण्यात येतील. यापैकी काहींवर भिंती बनवल्या जातील, तर काही द्वारांवर आरपीएफ जवान तैनात असतील. तर काही प्रवेश द्वारांवर बंद होणारी फाटकं लावली जातील. प्रत्येक प्रवेश द्वारावर सुरक्षा तपासणी होईल. पण त्यासाठी प्रवाशांना विमानतळाप्रमाणे 3-4 तासांआधी यायची गरज नाही, तर त्यांना गाडीच्या वेळेच्या फक्त 15-20 मिनिटे अगोदर यायचं आहे. जेणेकरुन तपास प्रक्रिये दरम्यान उशीर होणार नाही. तसेच या तपासणीसाठी प्रत्येक प्रवाशाला या प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही तर 8-9 प्रवाशांपैकी कुठल्याही एकाच प्रवाशाला या प्रक्रियेतून जावे लागेल’, असे अरुण कुमार यांनी सांगितले.

या व्यवस्थेने सुरक्षेत वाढ होईल पण सुरक्षारक्षकांमध्ये नाही. नव्या टेक्नॉलॉजीमुळे अधिक कर्मचाऱ्यांची गरज भासणार नाही, असेही अरुण कुमार यांनी सांगितले.