हार्दिक पटेल बोहल्यावर चढणार, तारीखही ठरली!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

गांधीनगर : पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल बोहल्यावर चढणार आहे. हार्दिकच्या लग्नाची तारीखही ठरली आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील किंजल पटेल हिच्याशी हार्दिक पटेल लगीनगाठ बांधणार आहे. हार्दिकचे वडील भरत पटेल आणि हार्दिकचे निकटवर्तीय निखील सवानी यांनी हार्दिकच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. येत्या 27 जानेवारीला हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. हार्दिकने मात्र अद्याप त्याच्या लग्नाबाबत कुठेही […]

हार्दिक पटेल बोहल्यावर चढणार, तारीखही ठरली!
Follow us on

गांधीनगर : पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल बोहल्यावर चढणार आहे. हार्दिकच्या लग्नाची तारीखही ठरली आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील किंजल पटेल हिच्याशी हार्दिक पटेल लगीनगाठ बांधणार आहे. हार्दिकचे वडील भरत पटेल आणि हार्दिकचे निकटवर्तीय निखील सवानी यांनी हार्दिकच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. येत्या 27 जानेवारीला हार्दिक पटेल विवाहबंधनात अडकणार आहे. हार्दिकने मात्र अद्याप त्याच्या लग्नाबाबत कुठेही काही सांगितले नाही.

26 आणि 27 जानेवारीला हार्दिक पटेलचं लग्न होणार असून, यात जवळचे असे केवळ 50 जणच उपस्थित असतील.

हार्दिकची होणारी पत्नी अर्थात किंजल पटेल ही सुरत येथील असून, हार्दिकपेक्षा किंजल दोन वर्षांनी लहान आहे. किंजल ही पारिख-पटेल समाजातील असून, तिने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. किंजल सध्या कायद्याचं शिक्षण घेते आहे.

इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हार्दिक जिच्याशी लग्न करणार आहे, ती किंजल पटेल ही मूळची अहमदाबाद जिल्ह्यातील वीरमगाम येथील रहिवाशी आहे. मात्र, तिचे कुटुंब सध्या सुरत येथे वास्तव्यास आहे. हार्दिकचं कुटुंब सुद्धा वीरमगाम येथील चंदननगरी येथील आहे.

हार्दिकच्या वडिलांची इच्छा होती की, हार्दिकचं लग्न ‘उमिया धाम’ येथे व्हावं. देवी उमियाने पाटीदारांच्या सत्तेच्या काळात हे मंदिर बनवलं होतं. मात्र, इथे हार्दिकचं लग्न होणं शक्य नाही, याचे कारण उंझामध्ये हार्दिकला प्रवेशास कोर्टाने मनाई केली आहे.