वसईत कलाकारांच्या शूटिंग लूकमुळे सुरक्षारक्षक घाबरला, दहशतवादी घुसल्याची चर्चा

वसई : वसईत दहशतवादी घुसल्याच्या माहितीमुळे सध्या पालघर जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरलं आहे. मात्र ते दहशतवादी नसून सिनेमाचे कलाकार असल्याची पालघर पोलिसांनी खात्री केली आहे. यामुळे पालघरमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. वसई पश्चिमेकडील भारत बँकेच्या सुरक्षा रक्षकाला सोमवारी 27 एप्रिलला दुपारी 3 च्या सुमारास एक व्यक्ती हत्यार घेऊन वावरत असल्याचं दिसलं. या व्यक्तीच्या दिसण्यावरुन […]

वसईत कलाकारांच्या शूटिंग लूकमुळे सुरक्षारक्षक घाबरला, दहशतवादी घुसल्याची चर्चा
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 10:33 AM

वसई : वसईत दहशतवादी घुसल्याच्या माहितीमुळे सध्या पालघर जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरलं आहे. मात्र ते दहशतवादी नसून सिनेमाचे कलाकार असल्याची पालघर पोलिसांनी खात्री केली आहे. यामुळे पालघरमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

वसई पश्चिमेकडील भारत बँकेच्या सुरक्षा रक्षकाला सोमवारी 27 एप्रिलला दुपारी 3 च्या सुमारास एक व्यक्ती हत्यार घेऊन वावरत असल्याचं दिसलं. या व्यक्तीच्या दिसण्यावरुन आणि हालचालीवरुन तो आतंकवादी असल्याचा सुरक्षा रक्षकाला संशय आला. यानंतर त्याने तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला फोन केला. पोलिसांना त्या सुरक्षा रक्षकाने पालघरमध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती दिली.

सुरक्षा रक्षकाने केलेल्या वर्णनावरून पालघर पोलिसांनी सदर व्यक्तीचा तपस सुरु केला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी हा व्यक्ती दिसलेल्या परिसरात सीसीटिव्हीची तपासणी सुरु केली. तपासणी करत असतानाच वसई पश्चिमेकडील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले. यावेळी हा व्यक्ती एका वाहनामध्ये बसून पुढे गेल्याचं पोलिसांना समजलं.

पोलिसांनी तात्काळ गाडीचा नंबर घेत शहरात नाकाबंदी लागू केली. नाकाबंदीत हा तरुण तात्काळ पकडला गेला. मात्र त्यावेळी हा तरुण आतंकवादी नसून सिनेमात काम करणार असल्याचं निष्पन्न झालं. याबाबत पोलिसांनी सर्व चौकशी करुन संबंधित तरुणाला सोडून दिलं आहे.

मात्र पालघर पोलिसांची तत्परता आणि अवघ्या काही तासात अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला शोधण्याच कसब यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. त्याशिवाय पोलिसांनी जागृकता दाखवणाऱ्या भारत बँकेच्या त्या सुरक्षा रक्षकाचा सत्कार केला

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.