10 राज्यात 80% कोरोना रुग्ण, मोदींचा 10 मुख्यमंत्र्यांना सल्ला, 72 तासांच्या प्लॅनिंगवर भर

| Updated on: Aug 11, 2020 | 2:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला (PM Modi take review meeting of Corona).

10 राज्यात 80% कोरोना रुग्ण, मोदींचा 10 मुख्यमंत्र्यांना सल्ला, 72 तासांच्या प्लॅनिंगवर भर
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या देशातील 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत कोरोना स्थितीचा आढावा घेतला (PM Modi take review meeting of Corona). यावेळी त्यांनी या 10 राज्यांमध्ये असलेल्या 80 टक्के कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत काळजी व्यक्त केली. तसेच या सर्व राज्यांना 72 तासांच्या नियोजनावर भर देण्याचा सल्ला दिला. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशभरात करण्यात आलेल्या क्वारंटाईन व्यवस्थांविषयी समाधान व्यक्त केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “देशातील 10 राज्यांमध्येच एकूण 80 टक्के रुग्ण आहेत. तसेच तेथे एकूण 82 टक्के मृत्यू होत आहेत. ही 10 राज्यं देशाचं चित्र पालटू शकतात. 10 राज्यांनी मिळून कोरोनाला हरवलं तर देश जिंकेल. कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी आहे. बरे होण्याचं प्रमाण देखील सुधारलं आहे. याचाच अर्थ आपले प्रयत्न यशस्वी होत आहेत.”


हेही वाचा : Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर

“देशात क्वारंटाईनची व्यवस्था चांगल्या पध्दतीनं केली आहे. यापुढील काळात कोरोना नियंत्रणासाठी 72 तासांच्या फॉर्म्युलावर भर देण्याचा प्रयत्न करावा. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर पुढील 723 तासांमध्ये त्याच्या संपर्कातील सर्वांच्या कोरोना चाचणी होणं आवश्यक आहे. आपल्याजवळ आरोग्य सेतू अॅपही आहे,” असं मोदी म्हणाले.

या बैठकीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात,तेलंगाणा, उत्तर प्रदेश या 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता.

हेही वाचा : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल

पंतप्रधान मोदी म्हणाले, “कोरोना रोखण्यासाठी 72 तासात रुग्णाच्या संपर्कातील सर्वांच्या चाचण्या हा उपाय महत्त्वाचा आहे. चाचण्या वाढवा, कंटेनमेंटसह मायक्रो कंटेनमेंट झोन बनवा. 1 टक्क्यापेक्षा कमी मृत्यूदर करणे, बरं होणाऱ्यांचं प्रमाण वाढवणे, स्क्रिनिंगवर भर देणे गरजेचं आहे.”

“नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना नियंत्रणावर काम केल्यास त्यावर नक्की आळा घालता येऊ शकतो. कंटेनमेंट झोनला पूर्णपणे वेगळं केलं जातंय. 100 टक्के स्क्रिनिंग केली जाणार आहे. आयसीयू बेडची संख्या वाढवायची आहे. देश ही लढाई जिंकेल आणि नवी लढाई लढली जाईल,” असंही मोदींनी सांगितलं.

हेही वाचा :

फडणवीसांशीही बोललो, मी सांगतो, जिम ओपन करा, राज ठाकरेंनी दंड थोपटले

शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे जलद, सेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांकडे नाराजीचा सूर

पुण्यातील 200 पेक्षा अधिक उद्यानं 4 महिन्यांपासून बंद, पालिका उत्पन्नाला कोट्यावधींचा फटका

PM Modi take review meeting of Corona