सोशल मीडिया सोडणार नाही, नरेंद्र मोदींनीच सांगितला ‘त्या’ ट्वीटचा खरा अर्थ

येत्या महिला दिनी, मी माझे सोशल मीडिया अकाऊण्ट प्रेरणादायी महिलांना वापरण्यास देईन, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. Narendra Modi clarifies on Giving up Social Media account

सोशल मीडिया सोडणार नाही, नरेंद्र मोदींनीच सांगितला त्या ट्वीटचा खरा अर्थ
| Updated on: Mar 03, 2020 | 2:07 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावरुन संन्यास घेणार असल्याचे ठोकताळे बांधले जात असतानाच आता नवी माहिती समोर आली आहे. ‘गिव्हिंग अप माय सोशल मीडिया अकाऊण्ट्स’ असं लिहित नरेंद्र मोदींनी शब्दांचे खेळ केल्याचं स्पष्ट झालं आहे. महिला दिनाचं औचित्य साधून रविवारी नरेंद्र मोदी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी महिलांना आपलं सोशल मीडिया अकाऊण्ट वापरण्यास देणार आहेत. (Narendra Modi clarifies on Giving up Social Media account)

नरेंद्र मोदी यांनी काल रात्री (सोमवार 2 मार्च) 9 वाजताच्या सुमारास ‘फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाऊण्ट्स ‘गिव्ह अप’ करण्याचा विचार’ बोलून दाखवत खळबळ उडवून दिली होती. लवकरच अधिक तपशील तुम्हाला देईन, असं मोदींनी सांगताच त्यांच्या ट्वीटचे नानाविध अर्थ लावले गेले. परंतु 15 तासांतच मोदींनी या
विचारामागील खरा अर्थ उलगडून दाखवला आहे.

‘येत्या महिला दिनी, ज्या महिलांचं जीवन आणि कार्य आम्हाला प्रेरणा देते, अशा महिलांना मी माझे सोशल मीडिया अकाऊण्ट वापरण्यास देईन. त्यामुळे त्यांना (महिलांना) लाखो  यूझर्सना प्रेरणा देण्यास मदत होईल.आपण अशी स्त्री आहात का? किंवा अशा प्रेरणादायी महिला तुम्हाला माहिती आहेत का? मग #SheInspiresUs हा हॅशटॅग वापरुन अशा कहाण्या शेअर करा’ अशा आशयाचं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटरवर 5 कोटी 33 लाख 70 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ते स्वत: 2 हजार 373 जणांना फॉलो करतात. तर फेसबुकवर मोदींचे 4 कोटी 45 लाख 98 हजार फॉलोअर्स आहेत.

हेही वाचापंतप्रधान मोदींच्या पावलांवर पाऊल, अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार?

Narendra Modi clarifies on Giving up Social Media account