…तर 20 एप्रिललाच तुम्हाला ‘लॉकडाऊन’मध्ये सशर्त सूट मिळेल

| Updated on: Apr 14, 2020 | 11:36 AM

20 एप्रिलपर्यंत जी क्षेत्र कोरोना हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांचे हॉटस्पॉटमध्ये परावर्तन होण्याची शक्यता कमी असेल, तिथे काही महत्त्वाच्या कामांना सशर्त परवानगी मिळू शकेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले (PM Narendra Modi on Lockdown Extension)

...तर 20 एप्रिललाच तुम्हाला लॉकडाऊनमध्ये सशर्त सूट मिळेल
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढवला आहे. म्हणजेच 3 मेपर्यंत ‘लॉकडाऊन 2’ चा कालावधी असेल. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. देशाला संबोधित करताना त्यांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. प्रत्येक कसबा, ठाणा, जिल्हा, राज्य यांचं मूल्यांकन करुन त्यात तावून सुलाखून निघालेल्या भागांना ‘लॉकडाऊन’मध्ये सशर्त सूट देण्याचे संकेत यावेळी मोदींनी दिले. (PM Narendra Modi on Lockdown Extension)

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

-लॉकडाऊन वाढवण्यात यावा, अशी सूचना प्रत्येक जण करत आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय अनेक राज्यांनी आधीच घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेऊन, आता भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवावे लागेल, हे निश्चित करण्यात आले आहे.

-3 मे पर्यंत आपल्या सर्वांना, प्रत्येक देशवासियाला लॉकडाऊनमध्येच रहावे लागेल. आतापर्यंत आपण करत आलेल्या नियमांचे पालन यापुढेही करावे लागेल

-माझी सर्व देशवासियांना विनंती आहे की आता ‘कोरोना’ आपल्याला कोणत्याही किमतीत नवीन भागात पसरु द्यायचा नाही. आता स्थानिक पातळीवर एकही रुग्ण वाढत असेल, तरी ती आपल्यासाठी चिंतेची बाब असू शकते

-आपल्याला हॉटस्पॉट्सबद्दल खूप सतर्कता बाळगावी लागेल. हॉटस्पॉटमध्ये रुपांतरित होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांवर बारकाईने नजर ठेवावी लागेल. नवीन हॉटस्पॉट्स तयार होणे, आपल्या श्रम आणि तपस्येला नवीन आव्हान देईल.

-पुढील आठवड्यात कोरोनाविरुद्धच्या लढतीत कठोरता आणखी वाढवण्यात येईल. 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक शहर, प्रत्येक ठाणे, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्याची चाचणी घेण्यात येईल, लॉकडाऊनचे पालन किती होत आहे, ‘कोरोना’पासून त्या भागाने स्वतःचे किती संरक्षण केले आहे, ते पाहिले जाईल

-या अग्निपरीक्षेत यशस्वी होणारे क्षेत्र, जे हॉटस्पॉटमध्ये नसतील आणि ज्यांचे हॉटस्पॉटमध्ये परावर्तन होण्याची शक्यता कमी असेल, तिथे 20 एप्रिलपासून काही महत्त्वाच्या कामांना सशर्त परवानगी मिळू शकेल. (PM Narendra Modi on Lockdown Extension)


संबंधित बातम्या : 

कुणालाही नोकरीवरुन काढू नका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी तीन दिवस वाढला

तोंडावर ‘गमछा’ बांधून संबोधन सुरु, कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’

(PM Narendra Modi on Lockdown Extension)