मुख्यमंत्र्यांचा 5 वा. जनतेशी संवाद, उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करणार?

| Updated on: Apr 11, 2020 | 4:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक (PM Narendra Modi Video Conference With All CM) झाली.

मुख्यमंत्र्यांचा 5 वा. जनतेशी संवाद, उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करणार?
Follow us on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक (PM Narendra Modi Video Conference With All CM) झाली. या बैठकीनंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी 5 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेला संबोधित करतील. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनवाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अनुकूल असल्याचं कळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची भूमिका घेतली. केंद्र सरकारनेच लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करावी, अशी भूमिका सर्वांची होती.

मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स

पंतप्रधान मोदींनी या बैठकीत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन वाढवायचा, काढायचा की प्रत्येक राज्यावर त्याचा निर्णय सोपवायचा याबाबतचा महत्त्वच्या विषयावर चर्चा केली. राज्यातील कोरोनाचा कहर पाहता, महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अनुकूल असल्याचं कळतंय.

नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील विविध (PM Narendra Modi Video Conference With All CM) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आज सकाळी 11 च्या सुमारास सुरुवात झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन वाढण्याची तयारी दर्शवली. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली. त्यामुळे महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

 

संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढवला पाहिजे. कोणत्याही एखाद्या राज्यात लॉकडाऊन हटवणं योग्य नाही, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार का याबाबतचा निर्णय लवकरच स्पष्ट होणार आहे.

भारतात लॉकडाऊन वाढणार का?

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. मात्र लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

तूर्तास तरी 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तसं सूतोवाच केलं आहेच. कोरोनाचा जिथून फैलाव झाला, त्या चीनमधील वुहानमध्ये झालेल्या 76 दिवसांच्या लॉकडाऊनचा दाखला कालच उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी किती ताणावे लागेल, याची चुणूक त्यांनी (PM Narendra Modi Video Conference With All CM) दाखवली.

 

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका

लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने काढावा असाही एक पर्याय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि आसपासचा परिसर, पुणे-पिंपरी चिंचवड, सांगली, अहमदनगर यासारख्या जिल्ह्यांना ‘कोरोना’चा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव न झालेल्या जिल्ह्याच्या सीमा बंदच ठेऊन अंतर्गत लॉकडाऊन अंशत: शिथील होण्याची शक्यता वर्तवली जाते.

सात राज्यांची मागणी

दुसरीकडे, विविध राज्यांच्या अहवालामध्येही लॉकडाऊन चालूच ठेवण्याचा सूर असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आतापर्यंत सात राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, हरियाणा, केरळ आणि दिल्ली सरकारची ही मागणी आहे. राज्यांच्या मागणीवर केंद्रही अनुकूल आहे, परंतु केंद्राने लॉकडाऊन न वाढवल्यास राज्य सरकार लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता (PM Narendra Modi Video Conference With All CM) आहे.