
कमी दिवसात जास्तीत जास्त पैशांचा परतावा मिळतो म्हणून सर्वसामान्य आपल्याकडील जमापुंजी असा कंपन्यात गुंतवित असतात. अशा योजनांमधून हजारो कोटींचा पैसा जमा केल्यानंतर कंपन्यांना गाशा गुंडाळून पाबोरा करीत असतात. आता मुंबई आणि परिसरातील टोरेस ज्वेलर्स कंपनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. लोकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतविली होती. त्यानंतर कंपनीने आपली कार्यालये बंद केल्याने लोकांचे धाबे दणाणले आहेत. टोरेस ही काही पहिली कंपनी नाही. आतापर्यंत दोनशेहून अधिक पाँझी स्कीम्स कंपन्या बंद पडल्या आहेत. लोक अशा कंपन्यांत बिनधास्तपणे गुंतवित असतात. त्यानंतर या कंपन्या बंद पडतात. पोलिस तोंड देखली कारवाई करतात. परंतू लोकांचे बुडालेले पैसे काही मिळत नाहीत. काय आहे हा घोटाळा पाहूयात….. टोरेस ज्वेलर्सचे मुंबई आणि परिसरात एकूण सहा आलिशान शोरूम होते. दादर, ग्रँट रोड, कांदिवली,सानपाडा, मीरा रोड, कल्याण येथे कंपनीची शोरुम आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीची सुरुवात झाली. मुंबईत या कंपनीची...