अॅम्बुलन्समधील पेट्रोल संपल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

| Updated on: Oct 06, 2019 | 12:49 PM

एका गर्भवती महिलेचा अॅम्बुलन्समधील पेट्रोल संपल्यामुळे मृत्यू (Pregnant woman dies odisha) झाला आहे. ही धक्कादायक घटना ओडीशाच्या मयुरजंग जिल्ह्यात घडली.

अॅम्बुलन्समधील पेट्रोल संपल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू
Follow us on

भुवनेश्वर (ओडीशा) : एका गर्भवती महिलेचा अॅम्बुलन्समधील पेट्रोल संपल्यामुळे मृत्यू (Pregnant woman dies odisha) झाला आहे. ही धक्कादायक घटना ओडीशाच्या मयुरजंग जिल्ह्यात घडली. तुळसी मुंडा असं मृत झालेल्या महिलेचं (Pregnant woman dies odisha) नाव आहे. या घटनेमुळे ओडिशातील रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर टीका केली जात आहे.

शनिवारी (5 सप्टेंबर) 23 वर्षीय गर्भवती आदिवासी महिलेला बांगिरिपोसीच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. रात्री तुळसीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तेथून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रस्त्यात अॅम्बुलन्स बंद पडल्यामुळे या महिलेला प्राण गमवावे लागले.

कुलियानजवळ अॅम्बुलन्सचे पेट्रोल संपले. दुसऱ्या गाडीची सुविधा करण्यासाठी आम्हाला किमान एक तासापेक्षा अधिक वेळ लागला, असं तुळसीचे वडील चितरंजन मुंडा यांनी सांगितले.

थोड्यावेळाने दुसऱ्या अॅम्बुलन्सची व्यवस्थ झाली आणि तुळसीला बारीपदा येथील रुग्णालयात दाखल केले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, असं मुंडा म्हणाले.

मयूरभंज जिल्ह्याचे मुख्य आरोग्य अधिकारी (सीडीएमओ) पी के महापात्र यांनी स्विकार केलं आहे की, पेट्रोल नसल्यामुळे अॅम्बुलन्सला रुग्णालयात पोहचण्यासाठी वेळ लागला. बारपीदाला जाताना गाडीत पेट्रोल होते पण पेट्रोलची पाईप लाईन लीक झाल्यामुळे गाडी बंद पडली, असा दावाही त्यांनी केला. या घटनेची जिल्हा प्रशासन चौकशी करेल, असं महापात्र म्हणाले.