VIDEO : रस्ता नसल्याने झोळीत टाकून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले

| Updated on: Feb 28, 2020 | 11:34 AM

रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी चक्क खांद्यावरुन झोळी करुन नेण्यात (Chattisgadh pregnant women) आले.

VIDEO : रस्ता नसल्याने झोळीत टाकून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले
Follow us on

बिलासपूर (छत्तीसगड) : रस्ता नसल्याने एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी चक्क खांद्यावरुन झोळी करुन नेण्यात (Chattisgadh pregnant women) आले. ही घटना छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील जरवही गावात घडली. या गावात जाण्यासाठी चांगला रस्त्या नसल्याने गावातील रुग्णांना झोळीतून मुख्य रस्त्यावर आणले जाते. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांचा मृत्यू झाला (Chattisgadh pregnant women) आहे.

या गावात जाण्यासाठी जो रस्ता आहे त्यावरुन एकही गाडी धावू शकत नाही. माणसांनाही येथून चालण्यासाठी कसरत करावी लागते. अशामध्ये जर गावात कुणाची तब्येत बिघडली तर लोक आपल्या खांद्यावरुन त्याला मुख्य रस्त्यावर आणतात. त्यानंतर त्यांना अॅम्ब्युलन्स मिळते.

जरवही गावात एक महिला गरोदर होती. अचानक तिची तब्येत बिघडली. गावातून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क गरोदर महिलेला खांद्यावरुन झोळीत टाकून मुख्य रस्त्यावर आणले. त्यानंतर तिला अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“रस्ता नसल्याने लोकांना नाईलाजाने या रस्त्याचा वापर करावा लागतो. गरोदर महिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी झोळीतून घेऊन जावे लागते. बऱ्याचदा यामुळे आतापर्यंत गरोदर महिलांचे मृत्यू झाले आहेत”, असं गावकऱ्यांनी सांगितले.

“गावकरी अनेकदा जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. आम्ही येथे एक रस्ता तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही प्रयत्न करत आहे की लवकरात लवकर येथे रस्ता तयार करावा”, असं बलरामपूर जिल्ह्याचे वनधिकारी प्रणय मिश्रा यांनी सांगितले.