ब्रिटनचा राजपुत्रही ‘सैराट’, बाळाचं नाव ‘आर्ची’ ठेवलं!

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

लंडन : ब्रिटनचा राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी 6 मे रोजी बाळाला जन्म दिल्यानंतर, त्याच्या नावाची उत्सुकता अवघ्या जगभरात होती. अखेर ब्रिटनच्या राजघराण्यातील या नव्या पाहुण्याचं नाव जाहीर करण्यात आले आहे. ‘आर्ची’ असे प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या यांच्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी बाळाचं नाव ‘आर्ची’ ठेवल्याने, भारतात […]

ब्रिटनचा राजपुत्रही सैराट, बाळाचं नाव आर्ची ठेवलं!
Follow us on

लंडन : ब्रिटनचा राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी 6 मे रोजी बाळाला जन्म दिल्यानंतर, त्याच्या नावाची उत्सुकता अवघ्या जगभरात होती. अखेर ब्रिटनच्या राजघराण्यातील या नव्या पाहुण्याचं नाव जाहीर करण्यात आले आहे. ‘आर्ची’ असे प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या यांच्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी बाळाचं नाव ‘आर्ची’ ठेवल्याने, भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगू लागली आहे. मराठीतील प्रसिद्ध ‘सैराट’ सिनेमातील मुख्य अभिनेत्री रिंकु राजगुरु हिचे सिनेमात ‘आर्ची’ नाव होते आणि ती भूमिका प्रचंड गाजली होती. योगायोगाने प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या बाळाचं नावही ‘आर्ची’ असल्याने अनेकजण नामसाधर्म्याचा संबंध जोडत विनोद करताना दिसत आहेत.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी आपल्या अधिकृत इन्सटाग्राम अकाऊंटवरुन बाळाचं नाव घोषित केलं. ‘आर्ची हॅरिसन माऊंटबेटन विंडसर’ असे बाळाचं पूर्ण नाव असेल, असे इन्स्टाग्रामवरुन सांगण्यात आले आहे. यासोबत प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी बाळासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत क्वीन आणि ड्युक ऑफ एडिनबर्गसोबतच आई डोरिया रॅगलँड सुद्धा दिसत आहेत.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचं हे बाळ ब्रिटनच्या राजघरण्याच्या उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर असेल.

सीएनएन वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, प्रिन्स हॅरी 8 मे रोजी दोन दिवसांसाठी नेदरलँडमध्ये जाणार होते. मात्र, त्यांनी नेदरलँड दौरा रद्द केला आहे.