पुण्यात हॉटस्पॉट वगळता इतरत्र अंशतः शिथिलता, प्रत्येक रस्त्यावर दहा दुकानं उघडणार

| Updated on: May 05, 2020 | 9:03 AM

देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Pune Corona Hotspot) आहे.

पुण्यात हॉटस्पॉट वगळता इतरत्र अंशतः शिथिलता, प्रत्येक रस्त्यावर दहा दुकानं उघडणार
Follow us on

पुणे : देशासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Pune Corona Hotspot) आहे. यादरम्यान आता पुणे शहरातील लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल करण्यात येणार आहे. पुण्यातील बाधित क्षेत्र वगळता अन्य भागात जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकाने उघडणार आहेत. पुण्यातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या तीन टक्के भागात निर्बंध राहणार आहेत. तर बाकी 97 टक्के भागात जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकानं सुरु करण्यात येणार (Pune Corona Hotspot) आहेत.

पुणे शहरातील भवानी पेठ, शिवाजी नगर-घोले रस्ता, कसबा पेठ, विश्रामबागवाडा, ढोले-पाटील रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेले कोरोना हॉटस्पॉटमध्ये निर्बंध कायम असणार आहेत. तर त्या व्यतिरिक्त भागात जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकानं सुरु केली जाणार आहेत. लॉकडाऊन कायम असल्याने नागरिकांनी घरातच राहायचे आहे, मात्र ज्यांना जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी काही प्रमाणात शिथिलता आणली जाणार आहे

“पुणे शहरातील तीन टक्के भाग बाधित आहे. या भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्रातील दुकानं बंदच राहतील.”, अशी माहिती पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूंची मिळून दहा दुकाने खुली राहतील. पेट्रोल पंपावर सामान्य नागरिकांनाही पेट्रोल दिले जाणार आहे. प्रमुख रस्ते चौकातून ये-जा करता येईल. चारचाकी दुचाकी वाहनांचा वापर करता येणार. त्यासोबत मद्याची दुकानेही सुरू राहणार आहेत.

शहरातील बांधकामे सुरू करता येतील. ई-कॉमर्स अंतर्गत येणाऱ्या अस्थापना सुरू राहतील. तसेच सलग दुकाने असलेल्या रस्त्यांवर दिवसा व्यवहार केला जाईल. बांधकामांना काही अटींवर परवानगी दिली जाणार आहे. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था केली जावी.

शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. मात्र आता रस्त्यावरील बॅरिकेड काढले जाणार आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार नाही. तसेच आयटी कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम असेल.

संबंधित बातम्या :

Pune Corona Update : पुण्यात दिवसभरात 71 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार पार

Pune Corona | आणखी चार अधिकारी दिमतीला, अजित पवारांचा निर्णय, पुणे कोरोनाविरुद्ध लढाईचं नियोजन

Corona | महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमा आणखी काही दिवस बंदच, ठाकरे सरकारचा निर्णय