पुण्यात स्थानिक संसर्ग शक्य मात्र अद्याप निष्कर्ष नाही, आरोग्य विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा

| Updated on: Mar 24, 2020 | 4:13 PM

पुण्यात 'कोरोना'च्या समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात असेलेल्या पाचजणांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

पुण्यात स्थानिक संसर्ग शक्य मात्र अद्याप निष्कर्ष नाही, आरोग्य विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा
Follow us on

पुणे : पुण्यात ‘कोरोना’च्या समूह (Pune Corona Third Stage) संसर्गाचा धोका वाढला आहे. परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात असेलेल्या चारजणांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या महिलेच्या संपर्कातील बहीण, बहिणीचा पती, मुलगी आणि आणखी एका नातलगाला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे ही (Pune Corona Third Stage) कोरोनाच्या समूह संसर्गाची सुरुवात तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.

मात्र, या सर्वांना परदेश प्रवास किंवा संबंधित प्रवाशांच्या संपर्काची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे स्थानिक संसर्गाची लागण सुरु झाल्याची शक्यता बळावली आहे. मात्र, दिल्ली आरोग्य विभागाच्या निष्कर्षानंतर याबाबत स्पष्टता होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

कोरोना बाधित महिलेचा पती एका खाजगी हॉटेलमध्ये काम करत आहे. त्याच्यापासून महिलेला संसर्ग झाला, की त्या महिलेपासून अन्य व्यक्तींना अद्याप याबाबत अस्पष्टता आहे.

परदेशी न जाताच महिलेला कोरोनाची लागण

पुण्यात परदेश प्रवास न केलेल्या किंवा त्यांच्याशी थेट (Pune Corona Third Stage) संपर्क न आलेल्या 41 वर्षीय महिलेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या या लोकांना परदेश प्रवास किंवा संबंधित प्रवाशांच्या संपर्काची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव सुरु झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 40
पुणे – 16
पिंपरी चिंचवड – 12
कल्याण – 5
सांगली – 4
नागपूर – 4
यवतमाळ – 4
नवी मुंबई – 3
अहमदनगर – 2
ठाणे -2
पनवेल – 1
औरंगाबाद – 1
रत्नागिरी – 1
सातारा – 1
उल्हासनगर – 1

एकूण 97

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबईत (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई महिला (1) – 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (3) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
सातारा (1) – 23 मार्च
एकूण – 97 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – 68 वर्षीय फिलिपिन्सची नागरिकाचा मृत्यू (1) – 23 मार्च
एकूण – 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Pune Corona Third Stage

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र लॉकडाऊन, संचारबंदी लागू, आजपासून कोणकोणते बदल?

इंधन महागणार, पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये, तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ

Corona | महाराष्ट्राचं पहिलं कोरोनाबाधित दाम्पत्य उपचारानंतर ठणठणीत, कोरोनाविरोधातील लढाई जिंकली