AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन महागणार, पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये, तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ

पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीत प्रति लिटर 18 रुपयांची, तर डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत 12 रुपयांची वाढ करण्यात आली आहे (Hike in Excise Duty of Petrol Diesel).

इंधन महागणार, पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये, तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ
Petrol Price May Come Down
| Updated on: Mar 23, 2020 | 11:57 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्यूटी) मोठी वाढ केली आहे. पेट्रोलच्या एक्साईज ड्यूटीत प्रति लिटर 18 रुपयांची, तर डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत 12 रुपयांची वाढ करण्यात आली आहे (Hike in Excise Duty of Petrol Diesel). मोदी सरकारने मार्च महिन्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या एक्साईज ड्यूटीत वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचा भडका उडणार आहे. इंधनाची किंमत वाढल्याने याचा भार सर्व सामान्यांच्या खिशावर पडणार आहे.

दरम्यान, गुरुवारी (19 मार्च) एसबीआयच्या इकोव्रॅप अहवालात (SBI- Ecowrap Report) सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्यूटीत वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

कच्चा तेलाच्या किमती 30 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम राहिली आणि सरकारने एक्साईज ड्यूटीत कोणतीही वाढ न केल्यास पेट्रोल डिझेलच्या किमती जवळपास 10 ते 12 रुपये प्रति लिटर कमी होऊ शकते, असा अंदाज माध्यमांमध्ये आलेल्या अहवालात वर्तवण्यात आला होता. मात्र, सरकारने एक्साईज ड्यूटी वाढवल्याने इंधन दर कमी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. आधीच कोलमडलेल्या आर्थिक स्थितीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळेच आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी सरकारने ही वाढ केल्याचं बोललं जात आहे.

याआधी केंद्र सरकारने 14 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 3 रुपयांच्या एक्साईज ड्यूटी वाढवली होती. त्यामुळे सरकारला 2,000 कोटीहून अधिकचा फायदा होईल, असा अंदाज वर्तवला गेला होता. या नव्या दरवाढीने यात आणखी भर पडणार आहे.

दरम्यान, जुलै 2018 मध्ये 147 डॉलर प्रति बॅरल इतक्या उच्चांकी दराने तेलाची विक्री झाली होती.

मार्च आणि एप्रिल महिन्यात कच्च्या तेलाची मागणी प्रतिदिन एक कोटी Barrel ने घटण्याची चिन्ह आहेत. एक Barrel म्हणजे 159 लिटर. म्हणजे दर दिवशी 159 कोटी लिटर कच्च्या तेलाचा वापर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या :

कच्च्या तेलाच्या किमती गडगडल्या, 18 वर्षांतील निच्चांक, पेट्रोल 30 रुपये लिटर द्या, काँग्रेसची मागणी

Hike in Excise Duty of Petrol Diesel

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.