Pune Corona Update | पुण्यात चार दिवसात 1050 नवे रुग्ण, लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे कोरोनावाढीस मदत!

| Updated on: May 25, 2020 | 10:21 PM

विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा एक हजारच्या पुढे गेला (Pune Corona virus Patient Update) आहे. 

Pune Corona Update | पुण्यात चार दिवसात 1050 नवे रुग्ण, लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे कोरोनावाढीस मदत!
Follow us on

पुणे : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पुण्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात (Pune Corona virus Patient Update) आली आहे. मात्र हीच शिथिलता कोरोनाच्या पथ्यावर पडली आहे. ही शिथिलता दिल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांनी पाच हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे शहरात दिलेली शिथिलता कोरोना वाढीस मदत करते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे शहरातील काही भागात गेल्या चार दिवसांपासून शिथिलता देण्यात (Pune Corona virus Patient Update)   आली आहे. मात्र त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा हा एक हजारच्या पुढे गेला आहे.

शिथिलता दिल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णसंख्या 

दिनांक – रुग्ण – मृत्यू – डिस्चार्ज

  • 21 मे – 265 – (7) – 150
  • 22 मे – 358 (15) – 189
  • 23 मे – 269 (7) – 132
  • 24 मे – 158 (7) – 77
  • एकूण रुग्ण – 1050

दुसरीकडे जनता वसाहतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जनता वसाहतीत आतापर्यंत 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जवळपास 25 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. जनता वसाहतीत आतापर्यंत 90 लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या आहे. तसेच पालिकेचे वैद्यकीय पथक रोज जनता वसाहतीत जाऊन आरोग्य तपासणी करत आहे. गेल्या 15 मे रोजी जनता वसाहतीत कोरोनाने शिरकाव केला होता.

इतकचं नव्हे तर आजपासून पुण्यात भुसार बाजार सुरू झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 19 मेपासून भुसार बाजार बंद होता.

पुणे शहरात सध्या 41 प्रतिबंधित क्षेत्र आहेत. ज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. मात्र इतर भागात प्रशासनाने दिलेल्या शिथिलतेमुळे शहरातील कोरोनाला रोखण्यास अनेक अडचणी येत (Pune Corona virus Patient Update) आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Update | पनवेलमध्ये 22 रुग्ण वाढले, कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या दिशेने

Pune Corona | पुण्यात दिवसभरात 205 नवीन कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या 5,899 वर