पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्याकडून उपमहापौरांनी रस्ता धुवून घेतला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

पुणे : एकीकडे देशात स्वच्छ भारत मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेचं आवाहन करत आहेत. दुसरीकडे, आजही अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यालयात थुंकणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी रस्त्यावर थुंकणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे. सिद्धार्थ धेंडे हे येरवडा भागातील फुलेनगर प्रभागातील नगरसेवक आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे […]

पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्याकडून उपमहापौरांनी रस्ता धुवून घेतला!
Follow us on

पुणे : एकीकडे देशात स्वच्छ भारत मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छतेचं आवाहन करत आहेत. दुसरीकडे, आजही अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यालयात थुंकणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी रस्त्यावर थुंकणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला आहे.

सिद्धार्थ धेंडे हे येरवडा भागातील फुलेनगर प्रभागातील नगरसेवक आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते असून उपमहापौर आहेत. नेहमीप्रमाणे ते प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करत होते. यावेळी प्रभागातील लुंबिनी थीम पार्क जवळ एक दुचाकीस्वार तरुण रस्त्यावर थुंकला. हा प्रकार पाहिल्यानं संतप्त झालेल्या धेंडेंनी तरुणाला थांबवून चांगलंच सुनावलं. मात्र एवढ्यावरच न थांबता स्वच्छतेचं महत्व समजावा म्हणून त्यांनी सदर तरुणाकडून पाण्यानं रस्ता साफ करुन घेतला. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचं आवाहन केलं.

या परिसरात स्वच्छता केल्यानंतर नेहमीच येणारे जाणारे पिचकार्‍या मारत असतात. इथं मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक असतात त्याचबरोबर विद्यार्थीही असतात त्यांना नेहमीच थुंकणाऱ्यांचा ञास सहन करावा लागतो. मात्र आता थेट उपमहापौरांनीच रस्तावर थुंकणाऱ्या तरुणाला अद्दल घडवल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.