Pune Lockdown | मार्केट यार्ड, भुसार मार्केट पुन्हा सुरु, फुल मार्केट मात्र बंद

| Updated on: Jul 19, 2020 | 9:29 PM

आता 21 तारखेपासून मार्केट यार्ड सुद्धा सुरु होणार आहे. चार उपबाजार आणि भुसार मार्केटही सुरु होणार आहे.

Pune Lockdown | मार्केट यार्ड, भुसार मार्केट पुन्हा सुरु, फुल मार्केट मात्र बंद
Follow us on

पुणे : पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा (Pune Lockdown Second Phase) आजपासून सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. त्यातच आता 21 तारखेपासून मार्केट यार्ड सुद्धा सुरु होणार आहे. चार उपबाजार आणि भुसार मार्केटही सुरु होणार आहे. मात्र, फुल बाजार 24 जुलैपर्यंत बंदच राहणार आहे. मार्केट यार्ड प्रशासक बी.जी. देशमुख यांनी याबाबत माहिती दिली (Pune Lockdown Second Phase).

रविवारी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, मार्केट यार्ड बंद असल्याने नागरिकांना भाजीपाला मिळू शकला नाही. भाज्यांच्या टंचाईमुळे दरवाढीची भीती आहे. त्यामुळे मार्केटयार्ड चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

मंगळवारी 21 जुलै पासून पुणे मार्केट यार्ड पूर्ववत सुरु होणार आहे. शेतकरी रात्री शेतमाल घेऊन येतील. सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत भाजीपाल्याची खरेदी-विक्री होईल. तर, भुसार बाजार सुद्धा 8 ते 12 या वेळेत सुरु राहील. त्याचबरोबर मांजरी, खडकी, मोशी आणि उत्तमनगर बाजार सुरु होईल.

मांजरी उपबाजार 21 तारखेपासून 8 ते 12 या वेळेत सुरु होईल. मोशी उपबाजार 20 तारखेपासून सुरु होईल. रात्री 1 वाजता शेतकरी शेतमाल घेऊन येतील आणि 9 वाजेपर्यंत खरेदी विक्री होईल. तर खडकी आणि उत्तमनगर उपबाजार 8 ते 12 या वेळेत सुरु राहतील. तर फुलांचा बाजार 24 तारखेपर्यंत बंद राहील (Pune Lockdown Second Phase).

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरण्याचं आवाहन मार्केट यार्ड प्रशासनानं केलं आहे.

Pune Lockdown Second Phase

संबंधित बातम्या :

पुण्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शिथिलता, दुकानांची वेळ ठरली, दारु दुकानांबाबतही निर्णय जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव, तिघांना संसर्ग, एकाचा मृत्यू