पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई, शर्ट काढून थुंकी पुसायला लावली

| Updated on: Jun 10, 2020 | 9:33 AM

पुण्यात रस्त्यावर थुंकल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला शर्ट काढून थुंकी पुसायला (Spit on Road Pune) लावली.

पुण्यात रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई, शर्ट काढून थुंकी पुसायला लावली
Follow us on

पुणे : पुण्यात रस्त्यावर थुंकल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला शर्ट काढून थुंकी पुसायला (Spit on Road Pune) लावली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अशा थुंकी बहाद्दरांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे रस्त्यावर थुंकणारे धास्तावले आहेत. विशेष करुन पान, तंबाखू खाणारे लोकं मोठ्या प्रमाणात थुंकतात. अशा सर्वांवर कारवाई केली जाणार (Spit on Road Pune) आहे.

पुण्यात या आधीही शहर स्वच्छता अभियानांतर्गत अशा कारवाई केल्या जात होत्या. तरीही नागरिकांमध्ये जागृती होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. त्यासोबतच अशा थुंकणाऱ्यांवर कारवाई करुन सहा महिने जेल होणार असल्याचेही सरकारने सांगितले होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. नागपुरातही थुंकणाऱ्यावर एक ते दहा हजार रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच मास्क नसेल तरीही प्रत्येकावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. थुंकणाऱ्यांवरही आळा बसण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेतला. पुण्यात झालेल्या कारवाईमुळे नक्कीच थुंकणाऱ्यांमध्ये भीती राहील आणि त्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांमध्ये घट होईल, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या :

उद्यापासून पुण्यात रस्त्यावर थुंकल्यास 150 रुपये दंड

Pune District Corona | पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारच्या उंबरठ्यावर