AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Lockdown | पुणे-पिंपरीमध्ये लॉकडाऊन; रस्ते-पेठांचे भाग बंद, सात हजार पोलिस तैनात

संपूर्ण पुणे शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल. अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल.

Pune Lockdown | पुणे-पिंपरीमध्ये लॉकडाऊन; रस्ते-पेठांचे भाग बंद, सात हजार पोलिस तैनात
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jul 14, 2020 | 7:47 AM
Share

पुणे : पुण्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जाहीर केलेला 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरु झाला आहे. पुणे शहरात मध्यरात्री ( मंगळवार 14 जुलै) एक वाजता सुरु झालेला लॉकडाऊन 23 जुलैपर्यंत कायम असेल. पुणे शहरातील रस्ते, पेठांचे भाग पोलिसांनी बंद केले असून लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे. (Pune Pimpari Chinchwad Lockdown Begins for 10 Days)

पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत.

संपूर्ण पुणे शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल. अत्यावश्यक सेवा, कामगार वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मनाई असेल. पेट्रोल पंप संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत

  • पुण्यात दहा दिवस सर्व सलून दुकानं, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद
  • 14 ते 18 जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवाले पूर्णपणे बंद
  • 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहतील
  • मटण, चिकन, अंडी यांची विक्री 14 ते 18 जुलै या पाच दिवसात पूर्णपणे बंद
  • 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मटण, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहील.
  • पुण्यात 13 ते 23 जुलै या दहा दिवसात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग पूर्णपणे बंद राहतील.

पाहा व्हिडिओ :

पुणे व्यापारी महासंघाचा विरोध मावळला

दरम्यान, पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत सरकारला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने आधी विरोध केला होता. मात्र विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक झाली. बैठकीत व्यापारी महासंघाने सामंजस्याची भूमिका घेत लॉकडाऊन मध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतली.

पुणे, पिंपरी चिंचवड तसेच हवेली आणि मुळशी तालुक्यातील 23 गावात लॉकडाऊन

लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायती :

हवेली तालुका : वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, मांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोर्हे बुद्रुक आणि खुर्द, डोणजे, खानापुर, थेऊर.

मुळशी तालुका : नांदे, भुगाव, भुकुम, पिरंगुट, घोटावडे, हिंजवडी या गावात लॉकडाऊन

संबंधित बातम्या :

पुण्यात कडकडीत लॉकडाऊन, आयटी, दूरसंचार कंपन्या, एमआयडीसी क्षेत्र सुरुच राहणार

(Pune Pimpari Chinchwad Lockdown Begins for 10 Days)

Follow Us
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?
ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोर
Arvinad Swanat | ठाकरेंचे शिलेदार अरविंद सावंतांचा राग पुन्हा एकदा उफाळला, माध्यमांसमोरच...
ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
Omraje Nimbalkar | ओमराजे थेट आंध्र प्रदेशला... नवस फेडण्यासाठी चक्क... नेमकं काय घडलं?
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह... पहा व्हिडीओ
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला