Pune corona Update | पुण्यात दुपारपर्यंत आणखी तिघांचा मृत्यू, पिंपरीत 2 लहान मुलांसह 9 नवे कोरोना रुग्ण

| Updated on: May 05, 2020 | 3:28 PM

पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचे 9 नवे रुग्ण आढळले आहेत. यात दोन लहान मुलांचाही समावेश (Pune Pimpri-Chinchwad Corona Update) आहे.

Pune corona Update | पुण्यात दुपारपर्यंत आणखी तिघांचा मृत्यू, पिंपरीत 2 लहान मुलांसह 9 नवे कोरोना रुग्ण
Follow us on

पिंपरी चिंचवड : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Pune Pimpri-Chinchwad Corona Update) आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज कोरोनाचे 9 नवे रुग्ण आढळले आहेत. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे पुण्यात गेल्या 24 तासात तीन जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आज (5 मे) कोरोनाचे 9 रुग्ण आढळले (Pune Pimpri-Chinchwad Corona Update) आहेत. आज सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये 3 रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता 6 रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आज दिवसभरात एकूण 9 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे

यातील तीन रुग्ण हे रुपीनगर भागातील आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात रुपीनगर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. आतापर्यंत या भागात सर्वाधिक 35 रुग्ण आढळले आहेत.

त्यामुळे आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 132 तर शहराबाहेरील उपचारासाठी 10 असे एकूण 142 रुग्णांना कोरोनाची लागण झाली.

पुण्यात तिघांचा मृत्यू 

तर दुसरीकडे काल (4 मे) संध्याकाळी 7 पासून आजपर्यंत तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही रुग्णांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या तिघांचा मृत्यू झाला.

यात 31 वर्षीय येरवडा येथील पुरुषाचा 4 एप्रिलला संध्याकाळी 7.15 ला मृत्यू झाला. तर रात्री 9.30 च्या सुमारास 63 वर्षीय भवानी पेठेतील पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या दोघांनाही कोरोनासह इतर व्याधीही होत्या.

तर वारजे माळवाडी येथील 11 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या मुलाला इतर व्याधी होत्या. शिवाय तो व्हेंटिलेटर असून त्याला झटके येत होते. उपचार सुरु असताना त्याला कोरोना प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे पुणे शहरातील कोरोनाबळींचा आकडा 110 वर पोहोचला असून जिल्ह्यात 118 रुग्णांचा मृत्यू झाला (Pune Pimpri-Chinchwad Corona Update) आहे.

संबंधित बातम्या : 

भवानी पेठेत चारशेपार कोरोनाग्रस्त, ढोले पाटील रोडवर 314 रुग्ण, पुण्यात कोणत्या प्रभागात किती?

हिंगोलीत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात 37 SRPF जवानांना लागण, रुग्णसंख्या 90 वर