गांजा, गुटख्यानंतर आता पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील कोंढवा परिसरात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. हुक्का विक्रीसाठी आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आलं (Pune Hukka Home Delivery)

गांजा, गुटख्यानंतर आता पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी, कोंढव्यात 84 हजाराचा मुद्देमाल जप्त
फोटो प्रातनिधीक
| Updated on: May 14, 2020 | 12:14 PM

पुणे : पुण्यात लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन मद्यविक्री सुरु झाली असतानाच हुक्काप्रेमींनाही तलफ अनावर झाली आहे. पुण्यात चक्क हुक्क्याची होम डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडलं. त्यामुळे आधी गांजा, नंतर गुटख्याची लपून तस्करी सुरु असताना आता हुक्क्याच्या विक्रीचा प्रकार समोर आला आहे. (Pune Hukka Home Delivery)

जिथे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळणं अवघड झालंय, तिथंच ऑनलाइन हुक्का डिलिव्हरी तेजीत आहे. ‘व्हॉट्स हॉट’ या संकेतस्थळावर मोबाईल संपर्क देऊन हुक्क्याची जाहिरात करण्यात आल्याची माहिती आहे. संकेतस्थळावर संपर्क करणाऱ्या व्यक्तीला हुक्क्याची घरपोच डिलिव्हरी केली जात होती.

पुण्यातील कोंढवा परिसरात तालाब चौक भागात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आलं. मित विजय ओसवाल, रॉयल जयराम मधुरम आणि परमेश महेश ठक्कर अशी आरोपींची नावं आहेत.

तिन्ही आरोपी 19 ते 28 वर्ष वयोगटातील आहेत. तिघांकडून 6 हुक्का पॉट, सहा पाकीट तंबाखूजन्य फ्लेवर, चार मोबाईल फोन, दोन मोपेड गाड्यांसह 84 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान हुक्का डिलीव्हरीची अनेक संकेतस्थळ उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे. या संकेतस्थळांवर विक्रेत्याचे मोबाईल नंबर देण्यात येतात. त्याचबरोबर हजारापासून पुढे ग्राहकानुसार जास्त पैसे घेऊन हुक्का घरपोच डिलिव्हरी केला जातो.

गुटखा विकणारे पुणे पोलिसातील हवालदार

पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनेक गुन्हे घडत असल्याचं समोर आलं आहे. मृत मनपा कर्मचाऱ्याच्या ड्रेस घालून दोन तरुण गांजा आणायला गेल्याचं उघड झाल्यानंतर अवैध गुटखा पकडला होता. धक्कदायक म्हणजे तो आरोपी चक्क पुणे पोलिसातील हवालदार असल्याचं समोर आलं होतं. (Pune Hukka Home Delivery)

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी नाकाबंदीदरम्यान, बेकायदेशीर गुटखा घेऊन पळून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडलं होतं. हे आरोपी पळून जात होते, त्यावेळी त्यांना नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले होते.

मनपा कर्मचाऱ्याचे कपडे घालून गांजा आणायला

पुण्यात एका पठ्ठ्याने अनोखी शक्कल लढवली होती. महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून हा पठ्ठ्या चक्क गांजा आणण्यासाठी गेला होता. पोलिसांनी संशयावरुन पकडल्यानंतर या ‘चरसी’चं बिंग फुटलं. पुणे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती.

संबंधित बातम्या 

लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला, पाठलाग करुन पकडलेला आरोपी निघाला पुणे पोलिसातील हवालदार!

मनपाच्या मृत कर्मचाऱ्याचा ड्रेस घालून गांजा आणायला, पुण्यातील धक्कादायक चित्र, लॉकडाऊनमध्येही गांजा विक्री

(Pune Hukka Home Delivery)