पुण्यातील रेड लाईट एरियात पोलिसांचं कोंबिग ऑपरेशन

पुण्यातील रेड लाईट एरियात पोलिसांचं कोंबिग ऑपरेशन

पुणे : पुणे पोलिसांनी आज शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या बुधवार पेठेत मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बुधावर पेठेतील हा परिसर वेश्या व्यवसायासाठी ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला राहतात. त्यामुळे येथील प्रत्येक इमारतीची झडती पोलिसांनी घेतली.

पुणे पोलिसांनी राबवलेल्या 4 तासांच्या कोंबिंग ऑपरेशनअंतर्गत बुधवार पेठेतील एकूण 35 कुंटणखाण्यांची झाडझडीत घेण्यात आली.

बुधवार पेठेत येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चौकशी पोलिसांनी केली. या ठिकाणी येणाऱ्या मुलीचे ओळखपत्र, पॅनकार्ड, वय हे तपासण्यासाठी ही कारवाई केली गेली. ज्यांच्याकडे ओळखपत्र, पॅनकार्ड नसेल, त्यांना बुधवार पेठेत राहता येणार नाही. तसेच, ज्यांच्याकडे ओळखपत्र नाहीत, त्यांनी दोन दिवसात हे सर्व कागदपत्रे दाखवली नाहीत, तर त्यांना येथे राहता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आतापर्यंत बुधवार पेठेत अशाप्रकारे मोठया प्रमाणात कारवाई झाली नव्हती. बांगलादेशी माहिला त्याच बरोबर काही गुंड या ठिकाणी थांबतात. या सर्व गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI