300 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल

| Updated on: Jan 09, 2020 | 6:48 PM

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले (Shivajirao bhosale sahkari bank scam) यांच्यासह सोळा जणांवर बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

300 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल
Follow us on

पुणे : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले (Shivajirao bhosale sahkari bank scam) यांच्यासह 16 जणांवर बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भोसले यांच्या पत्नी नगरसेवक रश्मी भोसलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप अनिल भोसलेंसह इतरांवर आहे. या प्रकरणी ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर (Shivajirao bhosale sahkari bank scam) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अनिल भोसले हे शिवाजीराव सहकारी बँकेचे अध्यक्ष असून पत्नी संचालक आहे. 16 जणांमध्ये संचालकांसह कॅशियरचाही समावेश आहे. बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींचा हा घोटाळा असून आतापर्यंत पावणे 72 कोटी प्रकरणी गुन्हा दाखल झाला. तर 222 कोटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास करण्यास सुरुवात केली आहे. कायद्यानुसार सर्वांना अटक करण्यात येणार असल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी कदम यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर शिवाजीराव भोसले बँकेचे कर्ज आहे. धनंजय मुंडे यांनी 1 कोटी 43 लाख रुपये थकवल्याचं बँकेचं म्हणणं आहे.

संबधित बातम्या :  

धनंजय मुंडेंना धक्का, पुण्यातील फ्लॅट जप्त!