AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडेंना धक्का, पुण्यातील फ्लॅट जप्त!

राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde Flat attached) यांच्या मागील अडचणींचा ससेमीरा कायम आहे.  विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde Flat attached)  पुन्हा अडचणीत आले आहेत.

धनंजय मुंडेंना धक्का, पुण्यातील फ्लॅट जप्त!
| Updated on: Oct 28, 2019 | 12:13 PM
Share

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde Flat attached) यांच्या मागील अडचणींचा ससेमीरा कायम आहे.  विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत असलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde Flat attached)  पुन्हा अडचणीत आले आहेत. पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांचा फ्लॅट बँकेने ताब्यात घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर शिवाजीराव भोसले बँकेचे (Shivajirao Bhosale Cooperative Bank (SBCB) ) कर्ज आहे. धनंजय मुंडे यांनी 1 कोटी 43 लाख रुपये थकवल्याचं बँकेचं म्हणणं आहे.

पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी  बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत धनंजय मुंडेंच्या मॉडेल कॉलनीतील युगाई ग्रीन सोसायटीतील फ्लॅटवर जप्ती आणल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी बँकेची कारवाई म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. मी निवडणुकीच्या धावपळीत असल्याने, निवडणुकीनंतर बँकेची थकीत रक्कम भागवेन असं कळवलं होतं, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

बँकेवर राष्ट्रवादीच्याच आमदाराचं वर्चस्व

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या फ्लॅटवर जप्ती आणणार्या शिवाजीराव भोसले बँकेवर राष्ट्रवादीच्या आमदाराचं वर्चस्व होतं. विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या नियंत्रणात बँकेचं कामकाज सुरु होतं. मात्र बुडीत कर्ज वाढल्याने रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले बँकेच्या आर्थिक नाड्या आवळून त्यावर निर्बंध लादले. इतकंच नाही तर या बँकेचं संचालक मंडळही बरखास्त करुन त्यावर प्रशासकाची नेमणूक केली.

या बँकेत जवळपास 16 हजार खातेधारक आहेत. 14 शाखांमार्फत कामकाज चालणाऱ्या या बँकेत जवळपास 430 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या बँकेने तब्बल 310 कोटींची कर्ज वाटली आहेत. त्यापैकी 294 कोटी रुपयांचं कर्ज एनपीए अर्थात बुडीत आहे.

धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

“मला गेल्या महिन्यात बँकेची थकीत कर्जाची नोटीस मिळाली. त्यानंतर मी निवडणुकीत व्यस्त असल्याचं बँकेला कळवलं. तसंच मी 30 ऑक्टोबरनंतर कर्ज फेडेन असंही बँकेला सांगितलं. मात्र बँकेने तरीही पुढची कारवाई करत, जप्तीची कारवाई केली”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

याशिवाय हा फ्लॅट म्हणजे बँकेचे माजी प्रमुख अनिल भोसले आणि आपल्यातील एक व्यवहार होता, असंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

मी आणि अनिल भोसले हे जुने मित्र आहोत. मी माझ्या वाट्याची रक्कम भरली, पण अनिल भोसलेंनी काही आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या वाट्याची रक्कम भरली नाही, असं मुंडेंनी सांगितलं.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...