32 पोलीस अधिकारी अनधिकृत, पुणे पोलिसांचं महासंचालकांना पत्र

32 पोलीस अधिकारी अनधिकृत, पुणे पोलिसांचं महासंचालकांना पत्र

पुणे: पिंपरी चिंचवड आयुक्तालयात 32 पोलिस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचं उघड झालं आहे. एक पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 8 पोलीस उपनिरीक्षक अनधिकृत आहेत. पुणे आयुक्तालयातून नव्याने झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीने हा घोळ झाला आहे. पुणे शहर आयुक्तालयातून वर्ग होऊन नवीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मोठ्या थाटामाटात स्थापन झाले. परंतु या दोन पोलीस आयुक्त कार्यलयातील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाही.

पुणे पोलिसांनी तब्बल 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचे पत्र, महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे पाठवलं आहे. पुणे पोलीस आयुक्त कार्यलयामधून पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यलयामध्ये नेमणुकीला आलेले 32 पोलीस अधिकारी या पत्रामुळे मात्र धास्तावले आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती या 32 अधिकाऱ्यांची झाली आहे.

काय करावे असा यक्ष प्रश्न या सगळ्यांसमोर आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यलयातील वरिष्ठ अधिकारी मकर रानडे यांनी ही बाब प्रशासकीय असल्याने यामध्ये कुठल्याही माध्यमांनी ढवळा ढवळ करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI