पुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले

| Updated on: Oct 15, 2020 | 12:22 PM

दौंड तालुक्यातील राजेगावच्या ओढ्यात दोन दुचाकीवरुन जाणारे 4 जण वाहून गेले आहेत.

पुण्यात मुसळधार पावसाने घेतला चौघांचा बळी, बाईकसह पाण्याच्या प्रवाहात वाहिले
Follow us on

पुणे : रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने पुण्यात हाहाकार माजला आहे. संपूर्ण शहरांत पाणी साचलं आहे. अशात मुसळधार पावसाने चौघांचा जीव गेल्याची बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील राजेगावच्या ओढ्यात दोन दुचाकीवरुन जाणारे 4 जण वाहून गेले आहेत. यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (pune rain update Four people died in water logging in Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जागोजागी घरांत पाणी शिरलं आहे तर रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. काही ठिकाणी तर भल्या मोठ्या गाड्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचं पाहायला मिळालं. यातच दौंडमधून धक्कादायक घटना समोर आली. दोन दुचाकींवर जाणारे 4 तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

पाण्याची पातळी आणि वेग इतका मोठा होता की चौघांचाही वाहून मृत्यू झाला आहे. भिगवाण वरून दौंडकडे जाणारे हे चौघे राजेगावच्या चोपडे वस्तीजवळील ओढ्यात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. यावेळी तिघांचे मृतदेह मिळाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर एकाचा मृतदेह शोधण्याचं काम अद्याप सुरू आहे.

दरम्यान, पुण्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. शहरातील बहुतेक भाग हा पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. रात्रभर संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर ओसरत असला तरी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यात आज पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या – 

Pune Rains LIVE: मुसळधार पावसानं कात्रज उड्डाणपुलाचा रस्ता उखडला

पुण्यात पावसाचा हाहाकार, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

(pune rain update Four people died in water logging in Pune)