पुण्यात पावसाचा हाहाकार, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

पुण्यात रस्त्यावरून चक्क वाऱ्यासारख्या वाहिल्या गाड्या, काळजात धडकी भरवणारा VIDEO VIRAL

पुण्यात पावसाचा हाहाकार, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

पुणे : पुणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील बहुतेक भाग हा पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. रात्रभर संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर ओसरत असला तरी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यात आज पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यात जिकडे तिकडे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचाच एक भयानक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी शहरात पूर आल्यासारखं पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. पुण्याच्या हिंगणेखुर्द परिसरातील हा व्हीडिओ आहे. संपूर्ण रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आंबील ओढा परिसरात पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथकं सज्ज असून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. पुण्यात परतीच्या पावसाने वेग धरला असून 2019 ची परिस्थिती पुण्यात पुन्हा होताना दिसत आहे. जोरदार पावसाने धुमाकूळ घातला असल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले.


सिंहगड रस्ता परिसरात वाहने वाहून गेली. चंदननगर पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं. दांडेकर पुलालगत सर्व्हे नंबर 133 मधील काही नागरिकांना साने गुरुजी शाळा आणि मनपा कॉलनी शाळा या दोन्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावर संतोष हॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. कृपया या भागातून जाण्याचं टाळावं अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या –

Weather Alert: मुंबई, ठाण्यासह राज्यभर रेड अलर्ट, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

साताऱ्यात रात्रभर मुसळधार पाऊस, नदीनाल्यांना पूर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत रात्रभरात सहा फुटांची वाढ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *