मोदी सरकारचं एकच काम, ‘गायब करणं’ : राहुल गांधी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नवी दिल्ली : युवकांचे रोजगार गायब झाले, 15 लाखांचं आश्वासन गायब झालं आणि काल राफेलच्या फाईल गायब झाल्या, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, मोदी सरकारचं एकच काम, ते म्हणजे ‘गायब करणं’, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राफेलच्या फाईल्स […]

मोदी सरकारचं एकच काम, गायब करणं : राहुल गांधी
Follow us on

नवी दिल्ली : युवकांचे रोजगार गायब झाले, 15 लाखांचं आश्वासन गायब झालं आणि काल राफेलच्या फाईल गायब झाल्या, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, मोदी सरकारचं एकच काम, ते म्हणजे ‘गायब करणं’, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राफेलच्या फाईल्स चोरीला गेल्याच्या प्रकरणावरुन मोदी सरकारवर निशाणा साधलाय.

मोदी सरकारचं एकच काम, ‘गायब करणं’ : राहुल गांधी

“युवकांचे रोजगार गायब झाले, 15 लाखांचं आश्वासन गायब झालं आणि काल राफेलच्या फाईल गायब झाल्या. मोदी सरकारचं एकच काम, ते म्हणजे गायब करणं” असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

मोदींच्या चौकशीची मागणी

राफेलच्या चोरी झालेल्या कागदपत्रात ज्यांची नावं आहेत, त्यांच्यावर कारवाई करा. त्यात सरळसरळ पंतप्रधानांच नाव आहे, असे राहुल गांधी म्हणाले. “ज्यांच्यावर कारवाई करायची, त्यांच्यावर करा, पण पंतप्रधानांवरही कारवाई करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

राफेल कराराची फाईल गायब झाली. या करारात सरकार चौकीदाराला (मोदी) वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

“राफेलच्या फाईलमध्ये पंतप्रधान कार्यलयाचं नाव आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चौकशी व्हायला हवी. जे पंतप्रधानांवर आरोप करतात, त्यांची चौकशी होऊ शकते, मात्र पंतप्रधानांचं नाव कागदपत्रात असलं, तरी त्यांची चौकशी का होऊ शकत नाही?”, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. सगळ्यांना समान न्याय लावला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.