इंडिया आघाडीला मोठा धक्का! राहुल गांधींच्या प्रयत्नांवर फिरले पाणी, डिलिमिटेशनला काही तास शिल्लक असतानाच मोठे अपयश

इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधींच्या प्रयत्नांनावर फिरले पाणी फिरल्याची माहिती मिळत आहे. इंडिया आघाडीला डिलिमिटेशन सादर करण्याला काही तास शिल्लक असतानाच मोठे अपयश हाती आले आहे.

इंडिया आघाडीला मोठा धक्का! राहुल गांधींच्या प्रयत्नांवर फिरले पाणी, डिलिमिटेशनला काही तास शिल्लक असतानाच मोठे अपयश
rahul gandhi news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 7:16 PM

डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीचे नेते आणि एमके स्टॅलिन यांच्यामध्ये 70 मिनिटे चर्चा झाली. परंतु या बैठकीत राहुल गांधींच्या प्रयत्नांना अपयश आलं आहे. डिलिमिटेशन विधेयक मांडण्याच्या आधी काही तास शिल्लक असताना इंडिया आघाडीच्या हाती मोठं अपयश लागलं आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. या भेटीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.

राहुल गांधी काय म्हणाले?

Loading...

इंडिया आघातील प्रमुख नेत्यांसहित खासदार राहुल गांधी यांनी चेन्नईत माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बोलताना डिलिमिटेशन विधेयकाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा न मिळू न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिलिमिटेशन विधेयकावरील आमची भूमिका एमके स्टॅलिन यांना समजावून सांगितली.

‘आमचा डिलिमिटेशन विधेयकाला विरोध कायम असणार आहे. भाजपला जे  हवंय, ते मिळू न देण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिलिमिटेशन हे तामिळ संस्कृतीसाठी घातक आहे. आरएसएस ही एक अँटी तामिळ फोर्स आहे.  भाजपने 850 आकडा गाठला तर संविधान संपेल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

डीएमके स्टॅलिन यांची भूमिका काय?

डीएमके स्टॅलिन यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, इतर नेते आणि तीन मुख्यमंत्री भेटीसाठी आले. डिलीमिटेशन विधयेकावरून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली. काल डीएमके खासदारांसोबत बैठक झाली. खासदारांसोबत डिलिमिटेशनवर चर्चा केली. सरकारने आमच्या अटी मान्य केल्या आहेत. तसेच काही समस्या देखील त्यांना सांगितल्या’.

‘डिलिमिटिशन विधेयक पडलं, तर तामिळनाडूचा वाटा कमी होऊ शकतो. त्यामुळे पुढील 25 वर्षांसाठी तामिळनाडूचे हक्क आणि त्याचा वाटा सुरक्षित ठेवण्यासाठी पाठिंब्याचा निर्णय घेतलाय,  असेही त्यांनी सांगितले.  दरम्यान, एमके स्टॅलिन यांच्या भूमिकेने इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. आता उद्या होणाऱ्या विशेष संसदीय अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us