Rahul Gandhi asks PM | पंतप्रधान गप्प का? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी? राहुल गांधी यांची प्रश्नांची सरबत्ती

| Updated on: Jun 17, 2020 | 10:03 AM

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. (Rahul Gandhi questions PM Narendra Modi over India China Face off)

Rahul Gandhi asks PM | पंतप्रधान गप्प का? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी? राहुल गांधी यांची प्रश्नांची सरबत्ती
Follow us on

नवी दिल्ली : चीनी सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल विचारले आहेत. पंतप्रधान गप्प का आहेत? जवानांना मारण्याची चीनची हिंमत कशी झाली? असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले आहेत. (Rahul Gandhi questions PM Narendra Modi over India China Face off)

पंतप्रधान मौन बाळगून का आहेत? ते लपून का बसत आहेत? झाले तेवढे बस्स झाले! काय झाले ते आम्हाला समजलेच पाहिजे. आपल्या जवानांना मारण्याची चीनची हिंमतच कशी झाली? आपली जमीन बळकावण्याची चीनचे धारिष्ट्य कसे झाले, अशा प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी मोदींना उद्देशून केली आहे.

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याचे दु:खद वृत्त आहे. शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवली जात आहे. संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा :  एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती दुपारी समोर आली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली होती.

गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. हे खोरे चीनच्या दक्षिण शिनजियांग ते भारताच्या लडाखपर्यंत पसरलेले आहे

भारतापुढे आता कोणते मार्ग?

1. परराराष्ट्रमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत सहभागी न होणे

रशियाच्या पुढाकाराने 22 जून रोजी रशिया, भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक आहे. बैठकीत सहभागी होणे टाळून भारत नाराजी दाखवू शकतो. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनविरोधातील भावनेचा लाभ घेण्यासाठी वातावरणनिर्मिती केली जाऊ शकते.

2. एलएसीवरील तणाव घटवणे

चीनशी राजनैतिक पातळीवर चर्चा सुरु ठेवणे, यामुळे एलएसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर) दोन देशांमधील तणाव कमी केला जाऊ शकतो.

3. परराष्ट्र मंत्रालय स्तरावर चर्चा

सध्या सेनास्तरावर सीमेवर वाटाघाटी सुरु आहेत. आता परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून मुत्सदी चर्चा होऊ शकते. तशी चर्चा झाली तर मार्ग लवकर सापडेल.

चीनच्या घुसखोरीची संभाव्य कारणे

1. कोरोनामुळे जगभरातून वाढलेला ताण, कारवायांना भारत पाठिंबा देत असल्याचा राग
2. हाँगकाँग संघर्ष, रुतलेल्या अर्थव्यवस्थेवर लक्ष हटवण्याचा प्रयत्न
3. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले
4. भारताच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणामध्ये बदल

संबंधित बातम्या :

भारत-चीन संघर्ष वाढला, भारतापुढे आता कोणते मार्ग?

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

(Rahul Gandhi questions PM Narendra Modi over India China Face off)