प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक आरोप; म्हणाला, आम्ही सर्व पुरावे दिले, पण…’

प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाने खळबळजनक आरोप केला आहे. आम्ही सर्व पुरावे दिले. आम्ही पोलिसांचं 80 टक्के काम पूर्ण केलं आहे, असं राम पूर्णेकरांनी सांगितलं आहे.

प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा खळबळजनक आरोप; म्हणाला, आम्ही सर्व पुरावे दिले, पण...
ram purnekar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 25, 2026 | 7:25 AM

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला आज 27 दिवस पूर्ण झाले आहेत. पण त्यानंतरही वडिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप दिवंगत प्रदीप पूर्णकरांचा मुलगा राम पूर्णेकरांनी केला आहे. या प्रकरणात राजकीय दबावामुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राम पूर्णेकरांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

राम पूर्णेकरांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत अप्रत्यक्षरित्या राजकीय नेत्यांवर आरोप केले आहेत. त्याने पोस्ट करत म्हटलं की, माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? पोलिसांना हवे होते, ते सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. परंतु राजकीय  दबावामुळे पोलीस फक्त चौकशीचं सोंग करत आहेत. मी आज हतबल झालोय. पण माझे पप्पा लढवय्या होते. मी त्यांच्यासारखं लढूनच न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार आहे’. राम पूर्णेकरांनी पोस्ट केल्यानंतर त्याला अनेक नेटकरी त्याला पाठिंबा देत आहेत.

Loading...

राम पूर्णेकरांनी काल पत्रकार परिषद घेऊनही त्यांनी धक्कादायक दावे केले. राम पूर्णेकरांनी कालच्या पत्रकार परिषदेत मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. त्यांनी आणखी एक सीसीटीव्ही दाखवला. त्यात पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये पप्या शिंदेची गाडी असल्याचे त्यांनी सांगितले. तो संपूर्ण परिसर हा मिनाक्षी शिंदे यांच्या घराजवळचा आहे. आरोपी त्यांच्या घराच्या परिसरात सकाळी 8.10 ते 8.40 पर्यंत का फिरत होते, अस सवाल त्यांनी केला.

पोलिसांचा दबाव…

राम पूर्णेकरांनी पुढे म्हटलं की, पोलिसांनी माझ्यावर दबाव टाकून एक पत्र लिहून घेतलंय. त्यांनी 13 ऑक्टोबर 2026 रोजी कासारवडवली पोलीस स्टेशनचे अधिकारी तीन तास घरी बसून होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांच्या घराबाहेर आंदोलन करणार नाही, असं लिहून घेतलं. तसेच त्यावर माझी सही देखील घेतली.  संबंधित पत्रात माझं हस्ताक्षर नाहीये. मला वाटलं नव्हतं की, हा इतका मोठा विषय होईल, असं म्हणत पोलिसांचाही कुटुंबीयावर दबाव असल्याचे राम यांनी म्हटलं.

पोलिसांचं 80 टक्के काम मीच करून दिलंय- राम पूर्णेकर 

राम पूर्णेकरांनी म्हटलं की, माझ्या घरी खासदार संजय राऊत , केंद्रीय मंत्री रामदास आठवले… सर्व पक्षाचे नेते येऊन गेले. फक्त आश्वासनं मिळाली आहेत. आक्रमक भूमिका दिसत नाहीए. मी कोणत्याही पक्षाचा नाही. माझ्या वडिलांना न्याया मिळावा, यासाठी मी सर्वांकडे हात जोडून भीक मागतोय. खरंतर पोलिसांची 80 टक्के काम मीच करून दिलं आहे. मी पोलिसांची मदत करतोय. पण जे दोघे नवरा-बायको यांना अटक होत नाही. त्या लोकांना सूट देण्यात आली आहे. आता उद्या एखादा गरीब माणूस निवडणुकीला उभा राहिला, तरी त्याला मारून टाकतील. आता माझ्या वडिलांसारखं कोणाच्या घरी व्हायला नको. त्यामुळे आधी या दोघांना आत टाका, अशी मागणी पूर्णेकरांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us